झारखंडमधील पवित्र तीर्थस्थळाला पर्यटनाचा दर्जा!
By अनिल गवई | Published: December 21, 2022 03:43 PM2022-12-21T15:43:59+5:302022-12-21T15:44:15+5:30
जैन धर्मियांचे सर्वोच्च शिखर असलेल्या सम्यक शिखराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णय झारखंड राज्य शासनाने घेतला आहे.
खामगाव:
जैन धर्मियांचे सर्वोच्च शिखर असलेल्या सम्यक शिखराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णय झारखंड राज्य शासनाने घेतला आहे. श्रध्दास्थान असलेल्या तीर्थस्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणे अयोग्य असल्याच्या भावना सकल जैन समाज बांधवांकडून निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आल्या. बुधवारी सकल जैन बांधवांच्यावतीने उपविभागीय अधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
जैन समाज बांधवांना सम्यक शिखर हे पर्यटन स्थळ नको असल्याने झारखंड राज्य शासनाने उपरोक्त निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशाराचाही मंगळवारी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. या निवेदनावर सकल जैन समाजाचे राजेंद्र नाहर, नरेंद्र संकलेचा, दिलीप जैन, मनोज शहा, हिरेन लोडाया, सुरेश चोपडा, नरेंद्र संचेती, विजय रूणवाल, राजेश बडजाते, सुयोग कासलीवाल, विवेक लकडे , सुरेंद्र छाजेड, अजय गोधे, प्रदीप जैन, विशाल कासलीवाल, नेमिचंद टिकाईत, नंदीनी टिकाईत, निता लकडे, रोशनी वास्कर, प्रज्ञा महिंद्रकर, कल्याणी मुर्तिजापूर, प्रगती खणे, अंजली महाजन, प्रविणा काळे, संध्या काळे आदींसह सकल जैन समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता सकल जैन समाजातील मातृशक्तीसह आबालवृध्द मोठ्यासंख्येने धडकले होते.