पर्यटकांचा ओघ पुन्हा सुरू झाल्यावर माथेरान पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 07:16 AM2021-07-12T07:16:41+5:302021-07-12T07:18:26+5:30

Matheran : २६ जूनपासून माथेरानमध्ये पर्यटकांना येण्यास परवानगी. लॉकडाऊनमुळे मुख्य व्यवसाय झाला होता ठप्प.

tourist are coming to matheran small business people happy with the decision need to follo corona rules | पर्यटकांचा ओघ पुन्हा सुरू झाल्यावर माथेरान पूर्वपदावर

पर्यटकांचा ओघ पुन्हा सुरू झाल्यावर माथेरान पूर्वपदावर

googlenewsNext
ठळक मुद्दे२६ जूनपासून माथेरानमध्ये पर्यटकांना येण्यास परवानगी.लॉकडाऊनमुळे मुख्य व्यवसाय झाला होता ठप्प.

माथेरान : कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे माथेरानमधीलपर्यटन हा प्रमुख व्यवसाय ठप्प झाला होता. पण माथेरानमध्ये २६ जूनपासून पर्यटकांना प्रवेश देण्यात आल्यावर येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. येथे येणारे पर्यटक मास्क परिधान करून निर्सगसौंदर्याचा आनंद घेत आहेत. गावातील अंतर्गत पॉईंट्स फिरण्यासाठी अस्तित्वात असणारी वाहतूक व्यवस्था वगळता, इथे राहण्याची व्यवस्था सध्या स्वस्त असल्याने अनेकजण एक दिवस मुक्काम करण्यास पसंती देत आहेत.

दोन महिने लॉकडाऊनच्या खडतर वाटचालीतून माथेरानमध्ये पर्यटनाला चालना मिळत आहे. मिनी ट्रेनच्या शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ केल्यामुळे अमन लॉज ते माथेरान असा स्वस्त दरात प्रवासाचा पर्याय पर्यटकांना उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शनिवार रविवारी पर्यटकांची वर्दळ येथे असते. 

नियम मोडल्यास कारवाई
नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन देखील विनामास्क आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. 

पर्यटनाला चालना म्हणून सध्या माथेरानमध्ये व्यावसायिकांना शनिवार व रविवारी दुकान उघडे ठेवायची सूट दिली आहे. पण ही मर्यादा शिथिल करून जर दुकाने जास्त वेळ उघडी ठेवण्यास मुभा दिली, तर व्यवसायास चालना अधिक देता येईल. तसेच गर्दीचे विकेंद्रीकरण होईल.
ज्ञानेश्वर बागडे, व्यावसायिक, माथेरान

Web Title: tourist are coming to matheran small business people happy with the decision need to follo corona rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.