महाराष्ट्रातील पर्यटकांवर गोव्यात हल्ला
By admin | Published: June 25, 2017 01:01 AM2017-06-25T01:01:43+5:302017-06-25T01:01:43+5:30
दारू पिऊन ‘सांजाव’ साजरा करणाऱ्या स्थानिक युवकांनी पर्यटकांची बस अडवून दोघांच्या डोक्यात बाटल्या फोडल्या, ते जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : दारू पिऊन ‘सांजाव’ साजरा करणाऱ्या स्थानिक युवकांनी पर्यटकांची बस अडवून दोघांच्या डोक्यात बाटल्या फोडल्या, ते जखमी झाले. येथून दहा किलोमीटरवरील वेरे गावात शनिवारी ही घटना घडली.
वेरे-मानस येथे काही युवक मद्यपान करून ‘सांजाव’ची मजा लुटत होते. काही पर्यटकदेखील तेथे आले होते. पार्किंगमधून बस वळवताना दोन स्थानिक युवकांचा पर्यटकांशी वाद झाला. त्यानंतर, पर्यटकांची बस निघाली. तेवढ्यात ते दोन युवक आणि आणखी दोघे अशा चार जणांनी बस अडवली आणि पर्यटकांवर हल्ला केला. बसमधील सहकाऱ्यांवर हल्ला होत असल्याचे पाहून सर्व जण खाली उतरले. जखमींची नावे, तसेच अन्य तपशील समजू शकलेला नाही.
पोलीस स्वत:हून दखल घेणार का?
या घटनेची पोलिसांत नोंद झालेली नाही. या घटनेमुळे देशी पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. पोलीस स्वत:हून दखल घेऊन युवकांना वठणीवर आणणार का? पर्यटनाची बदनामी थांबविण्याचा प्रयत्न करणार का, हा प्रश्न आहे.
महिन्यात दुसरी घटना
महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटकांवर गोव्यातील स्थानिक युवकांनी हल्ला करण्याची ही दुसरी घटना आहे.
मेरशी गावात १४ जूनला चार
स्थानिक युवकांनी वसईतील (ठाणे) पर्यटकांची गाडी अडवून प्राणघातक हल्ला केला होता.