ताडोबात पर्यटकांची अडचण होणार नाही - एमटीडीसी
By Admin | Published: February 28, 2015 04:51 AM2015-02-28T04:51:49+5:302015-02-28T04:51:49+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात होळी व धूलिवंदनाच्या दिवशी ज्या परदेशी पर्यटकांनी आगाऊ नोंदणी केली आहे़, त्यांची कोणतीही अडचण होणार नाही,
मुंबई : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात होळी व धूलिवंदनाच्या दिवशी ज्या परदेशी पर्यटकांनी आगाऊ नोंदणी केली आहे़, त्यांची कोणतीही अडचण होणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ताडोबात येणाऱ्या विदेशी पर्यटकांना आॅनलाइन नोंदणी करण्याची सुविधा एमटीडीसीने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे ५ मार्चसाठी ९३ आणि ६ मार्चसाठी ६३ अशा एकूण १५६ वाहनांचे आरक्षण झाले आहे. मात्र, वनविभागाने काढलेल्या व्याघ्र प्रकल्प बंदच्या आदेशामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती़ या पार्श्वभूमीवर लोकमतने सोनी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्यासाठी आपले पर्यटक जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच परदेशी पर्यटकदेखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. ज्यांनी बुकिंग करून आपला भारतात येण्याचा कार्यक्रम ठरवला असेल अशांना शासकीय सुटीची कोणतीही अडचण होणार नाही. आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ आणि तशा सूचनादेखील देऊ, असे स्पष्टीकरण सोनी यांनी दिले़ (प्रतिनिधी)