विषप्राशन करणा-या शेतक-याचा मृत्यू

By admin | Published: September 4, 2016 05:08 PM2016-09-04T17:08:38+5:302016-09-04T17:08:38+5:30

कर्जबाजारीपणाला कंटाळल्याने ३ सप्टेंबर रोजी सांयकाळी ७ वाजता विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

The toxic death of the farmer | विषप्राशन करणा-या शेतक-याचा मृत्यू

विषप्राशन करणा-या शेतक-याचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत 

आसोला खुर्द, दि. ४ -  मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथील शेतकरी मनोहर भिमराव जाधव (४५) या शेतक-याने  सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळल्याने ३ सप्टेंबर रोजी सांयकाळी ७ वाजता विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या शेतक-याचा ४ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
 
मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथील शेतकरी मनोहर भिमराव जाधव यांनी सततची नापिकीला कंटाळल्याने ३ सप्टेंबर रोजी राहत्या विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने उपचारासाठी मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तेथून यवतमाळ येथे हलविण्यात आले; 
 
परंतु ४ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मनोहर जाधव यांचेकडे परिसरातील हातोली शिवारात ४ एकर कोरडवाहू शेती आहे. मागील तीन वर्षांपासून नापिकी होत असल्याने त्यांच्यावरील कर्ज वाढतच होते. त्यांच्यावर सद्यस्थितीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ४५ हजार रुपयांचे कर्ज आहे, तसेच त्यांच्यावर काही खासगी सावकारी कर्जही असल्याची माहिती आहे. त्यांचे पश्चात तीन मुली, एक मुलगा, असा परिवार आहे.

Web Title: The toxic death of the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.