आईने घेतले विषारी औषध
By admin | Published: January 19, 2017 05:20 AM2017-01-19T05:20:54+5:302017-01-19T05:20:54+5:30
सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणात पोलिसांवर दबाव टाकत मुलाची अटक टाळण्यासाठी आईने मंगळवारी रात्री विषारी औषध सेवन केले.
श्रीरामपूर (अहमदनगर) : सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणात पोलिसांवर दबाव टाकत मुलाची अटक टाळण्यासाठी आईने मंगळवारी रात्री विषारी औषध सेवन केले. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत संतापात महिलेने विष घेतले.
धूमस्टाईलने महिलांच्या गळ््यातील सोन्याचे दागिने पळविणाऱ्या टोळीचा छडा श्रीरामपूर शहर पोलिसांनी लावला. पोलिसांनी सुनील देवराम पवार (मूळ रा. परतूर, जालना) यास अटक केली. पोलिसांनी दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण व मोटारसायकल जप्त केली. पोलिसांनी रात्री अशोकनगर येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी छापा टाकला. मात्र छापा पडण्यापूर्वीच तेथील संशयित पसार झाला होता. (प्रतिनिधी)