दारूबंदीसाठी पोलीस चौकीसमोर विषप्राशन

By admin | Published: September 5, 2015 12:54 AM2015-09-05T00:54:48+5:302015-09-05T00:54:48+5:30

अवैध दारूविक्रीची दुकाने बंद करण्यासाठी लोणार तालुक्यातील बिबी येथील महिलांनी केलेल्या विविध आंदोलनांची दखल घेत प्रशासनाने ३ सप्टेंबर

Toxicology in front of a police chowk for drunkenness | दारूबंदीसाठी पोलीस चौकीसमोर विषप्राशन

दारूबंदीसाठी पोलीस चौकीसमोर विषप्राशन

Next

बुलडाणा : अवैध दारूविक्रीची दुकाने बंद करण्यासाठी लोणार तालुक्यातील बिबी येथील महिलांनी केलेल्या विविध आंदोलनांची दखल घेत प्रशासनाने ३ सप्टेंबर रोजी दारूबंदीकरिता स्वाक्षरी मोहीम आयोजित केली होती. मात्र ऐनवेळी ही मोहीम पुढे ढकलल्याने संतापलेल्या एका महिलेने येथील पोलीस चौकीसमोर विषप्राशन केल्याची घटना गुरुवारी घडली. सर्व महिला गुरुवारी सकाळपासून संतोषी माता मंदिरात स्वाक्षरी अभियानासाठी सज्ज झाल्या होत्या. मात्र महसूल विभागाने ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचे कारण दाखवून अभियान पुढे ढकलले. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सुनीता श्रीकिसन भांड यांनी पोलीस चौकीसमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Toxicology in front of a police chowk for drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.