राज्यातील ४ हजार रुग्णवाहिकांसह वैद्यकीय वाहनांवर लागणार ‘ट्रॅकर’!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 02:05 AM2020-07-18T02:05:07+5:302020-07-18T02:05:37+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांना ट्रॅकर लावल्यामुळे सर्वच वाहने संपर्कात राहतील.
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने राज्यातील ४,८२१ वाहनांवर जीपीएस, जीपीआरएस प्रणाली अंतर्गत ट्रॅकर बसविण्यात येणार आहे.
यासोबतच राज्यातील १०२ व १०८ रुग्णावाहिकांचे आरक्षण व मोबाइल मेडिकल युनिटचे ट्रॅकिंग करण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन तयार करणे, तसेच १०२ कॉल सेंटर चालविण्यासाठी बाह्य यंत्रणा नियुक्त करण्यासंदर्भात राज्य शासनाने गुरुवारी शासन निर्णय निर्गमित
केला.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांना ट्रॅकर लावल्यामुळे सर्वच वाहने संपर्कात राहतील. यामुळे ही सेवा आणखी सुलभ होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.