पोळ्याचा तोरणाखाली बैलाच्या दिमतीला ट्रॅक्टर !

By admin | Published: August 31, 2016 06:54 PM2016-08-31T18:54:16+5:302016-08-31T18:54:16+5:30

कृषीप्रधान देश म्हणून लौकिक असलेल्या भारतात प्राचीन काळापासून शेतीसाठी बैलांचा वापर करण्याची प्रथा आहे. बळीराजा वर्षभर राबून बैलांच्या भरवशावर शेती करतो

Tractor for the oxygen under the hood! | पोळ्याचा तोरणाखाली बैलाच्या दिमतीला ट्रॅक्टर !

पोळ्याचा तोरणाखाली बैलाच्या दिमतीला ट्रॅक्टर !

Next
>-  नंदकिशोर नारे/ ऑनलाइन लोकमत
 
वाशिम, दि. 31 - कृषीप्रधान देश म्हणून लौकिक असलेल्या भारतात प्राचीन काळापासून शेतीसाठी बैलांचा वापर करण्याची प्रथा आहे. बळीराजा वर्षभर राबून बैलांच्या भरवशावर शेती करतो म्हणून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने पोळा हा सण साजरा करण्यात येतो. परंतु अलिकडच्या काळात शेतीची सर्व कामे बैलांऐवजी ट्रॅक्टरने केली जात असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सिमेवर अस कनेरगाव नाका येथे बैलांसह ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात येतो.
 दरवर्षी हा अनोखा पोळा भरविण्यात येतो. हा आगळावेगळा पोळा पाहण्यासाठी दूरवरून अनेक लोक येथे येतात. त्यामुळे हा पोळा कुतुहलाचा विषय ठरत आहे. तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात बैलांचे श्रम मागे पडले असून, विविध यंत्रांनी त्यांची जागा घेतली आहे. शेतीमधील नांगरणी, वखरणी, पेरणी आदि कामांसाठी सर्रासपणे बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर करण्याची प्रथाच ग्रामीण भागात सुरू झाली आहे. जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी शेतकºयांना ट्रॅक्टरची साथ मिळाल्याने कनेरगावात १४ वर्षांपूर्वी कै. शरद केशवराव जोशी यांनी बैलांसोबतच ट्रॅक्टरचा पोळा भरविण्याची संकल्पना मांडली. त्याला प्रतिसाद मिळाला आणि पहिल्याच वर्षी १० ट्रॅक्टर सजवून पोळ्यात सहभागी करण्यात आले. ही प्रथा तेव्हापासून कायमच असून, आजमितीला येथे ३० ते ३५ ट्रॅक्टर पोळ्यात सहभागी होत आहेत.  पोळ्याच्या दिवशी या ट्रॅक्टर्सची मानकºयाच्या हस्ते पुजा झाल्यानंतर गावातून मिरवणूक काढून पोळा फुटल्यानंतर घरोघरी बैलांप्रमाणेच या ट्रॅक्टर्सचीही पुजा करण्यात येते.  हा आगळा वेगळा पोळा पाहण्यासाठी मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या कनेरगावात नजिकच्या विदर्भातूनही  हजारो लोक कनेरगावात येतात. हा पोळा भरविण्यासाठी कनेरगाववाासी परिश्रम घेतात.

Web Title: Tractor for the oxygen under the hood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.