व्यापाऱ्यांना अडचणीत आणण्याचे उद्योग
By admin | Published: June 28, 2016 01:02 AM2016-06-28T01:02:57+5:302016-06-28T01:02:57+5:30
उद्योजक व व्यापाऱ्यांच्या मदतीवरच भाजपला केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन करता आली.
येरवडा : उद्योजक व व्यापाऱ्यांच्या मदतीवरच भाजपला केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन करता आली. मात्र, भाजप सरकारने व्यापाऱ्यांनाच अडचणीत आणण्याचे ‘उद्योग’ सुरू केल्याने व्यापारी बांधवांना भाजपला निवडणुकांमध्ये केलेल्या मदतीचा पश्चाताप होत आहे. पुणे शहरावर पुढील काळात पूर्णपणे शिवसेनेचेच वर्चस्व राहील, असे मत शिवसेनाप्रणीत शिव व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चिंंटू शेख यांनी व्यक्त केले.
येरवड्यात अतुर भवनमध्ये घेण्यात आलेल्या शिव व्यापारी सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेच्या कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस रघुनाथ कुचिक, व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसन्नकुमार, पुणे शहराध्यक्ष आनंद गोयल, पालिका गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक संजय भोसले, विजय देशमुख, सागर माळकर, युवा सेनेचे शहराध्यक्ष नितीन भुजबळ, विशाल शेंडकर, जावेद सय्यद, अनिल जावळकर, संजय जाधव, राजेंद्र शितोळे, सुजीत गंगावणे, नौशाद शेख, रितेश अगरवाल, अशोक अगरवाल, अनिल अगरवाल, विनोद गोयल, मोहन अगरवाल, संजय अगरवाल, विनोद अगरवाल, मोहन अगरवाल, नरेश अगरवाल व पुणे शहरातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंद गोयल यांनी स्वागत
केले. प्रशांत मोरे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
या वेळी आनंद गोयल यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण सुभाष उत्तेकर, नीलम विष्णू जाधव व निखिल गजरमल या अपंग व्यक्तींना तीनचाकी सायकल भेट दिल्या, तसेच येरवड्यातील जीवनधारा अपंग संचालित संस्थेतील मतिमंद मुलांना शालेय साहित्याची मदत केली.