पारंपरिक विद्यापीठात ‘पुणे’ पहिले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 07:38 PM2018-09-28T19:38:08+5:302018-09-28T20:53:14+5:30
जागतिक क्रमवारीत सुधारणा झाल्याने देशपातळीवरही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आघाडीवर आहे. पारंपरिक विद्यापीठांमध्ये विद्यापीठ देशात पहिल्या स्थानावर आहे.
पुणे : द टाईम्स हायर एज्युकेशन (टीएचई) क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर इतर विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. तसेच जागतिक क्रमवारीत विद्यापीठाला ५०१ ते ६०० या गटात स्थान मिळाले आहे. विद्यापीठाने यंदा तब्बल २०० क्रमांकांनी झेप घेतली आहे.
जगातील विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांचे त्यांच्या सर्व क्षेत्रातील कामगिरीच्या आधारे टीएचईकडून दरवर्षी क्रमवारी जाहीर केली जाते. या संस्थेने २०१९ साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. शिक्षण संस्थांसाठी ही क्रमवारी प्रतिष्ठेची मानली जाते. अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार आणि आंतरराष्ट्रीय भान या चार निकषांवर विशेष भर दिला जातो. याशिवाय इतर १३ महत्त्वाच्या निकषांच्या आधारे गुणांकन दिले जाते. या क्रमवारीमध्ये पहिल्या एक हजार विद्यापीठांची नावे जाहीर केली जातात. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ २०१६ पासून सहभागी होत आहे. मागील तीन वर्ष विद्यापीठाचा समावेश पहिल्या ६०१ ते ८०० विद्यापीठांच्या गटात होत होता. त्यात मोठी सुधारणा होऊन आता विद्यापीठ पहिल्या ५०१ ते ६०० विद्यापीठांच्या गटात आले आहे.
जागतिक क्रमवारीत सुधारणा झाल्याने देशपातळीवरही विद्यापीठ आघाडीवर आहे. पारंपरिक विद्यापीठांमध्ये विद्यापीठ देशात पहिल्या स्थानावर आहे. तर सर्व संस्थांमध्ये संयुक्तपणे सहावे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे वरच्या पाच संस्थांमध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सेस, तीन आयआयटी आणि मैसूरच्या जेएसएस अकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च या वैद्यकीय विद्यापीठाचा समावेश आहे. ह्यनॅशनल इन्स्टिट्यूशलन रँकिंग फ्रेमवर्कह्णने (एनआयआरएफ) नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीत विद्यापीठाचा नववा क्रमांक आला होता. आता विद्यापीठाने आणखी प्रगती केल्याचे ह्यटाइम्स हायर एज्युकेशनच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याच मूल्यांकनात देशातील पारंपारिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०१६ मध्ये तिसरा, तर २०१७ मध्ये दुसरा क्रमांक आला होता. २०१८ मध्ये विद्यापीठाने संयुक्त पहिला क्रमांक पटकावला होता. आता पारंपारिक विद्यापीठांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.
--------------------
जागतिक क्रमवारीत एक महत्त्वाचा टप्पा ओलांडणे हे आव्हान असते. त्यापैकी एक आव्हान आम्ही पार केले आहे. आतापर्यंत ६०१ ते ८०० या गटातून आम्ही ५०१ ते ६०० विद्यापीठांच्या गटात पोहोचलो आहोत. आता पुढचा टप्पा पहिल्या ५०० विद्यापीठांच्या गटात पोहोचण्याचा असेल. आम्ही योग्य दिशेने काम करत आहोत, हे या गुणांकनावरून स्पष्ट झाले आहे. यामुळे आणखी जबाबदारीही वाढली आहे.
- डॉ. नितीन करमळकर
कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ‘टीएचई’ने अध्यापन, संशोधन, आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन, सायटेशन, उद्योगांकडून उत्पन्न अशा विविध निकषांच्या आधारे मुल्यमापन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला एकुण ३३.५ ते ३७ गुण मिळाले आहेत. अध्यापनामध्ये विद्यापीठ ३८.८ गुणांसह सातव्या क्रमांकावर राहिले. संशोधनामध्ये विद्यापीठाला कमी गुण मिळाले आहेत. देशात विद्यापीठ १७ व्या क्रमांकावर असून केवळ १५.४ गुण मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन व उद्योगाकडून उत्पन्न या गटांमध्ये अनुक्रमे १७.६ व ३५.६ गुणांसह विद्यापीठ २३ व्या स्थानावर राहिले.देशातील ‘टॉप’ संस्था (कंसात जागतिक क्रमवारी)
१. इंडियन इन्स्टिट्युट आॅफ सायन्स, बंगळुरू (२५१-३००)
२. आयआयटी, इंदौर (३५१-४००)
३. आयआयटी, मुंबई (४०१-५००)
४. आयआयटी, रुरकी (४०१-५००)
५. जेएसएस अॅकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन अॅन्ड रिसर्च (४०१-५००)
६. आयआयटी, दिल्ली (५०१-६००)
७. आयआयटी, कानपुर (५०१-६००)
८. आयआयटी, खरगपुर (५०१-६००)
९. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (५०१-६००)