औरंगाबादमधील अजिंठा घाटात अपघातामुळे वाहतूक कोंडी

By Admin | Published: May 6, 2017 12:11 PM2017-05-06T12:11:05+5:302017-05-06T14:00:16+5:30

औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड-सोयगाव तालुक्याला जोडणा-या अजिंठा घाटात पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली.

A traffic accident due to an accident in Ajantha Ghat in Aurangabad | औरंगाबादमधील अजिंठा घाटात अपघातामुळे वाहतूक कोंडी

औरंगाबादमधील अजिंठा घाटात अपघातामुळे वाहतूक कोंडी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 6 - अजिंठा घाटात दर्गाजवळ नादुरुस्त उभ्या असलेल्या एका ट्रकला समोरुन येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात  2 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे पहाटे 5:30 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल 7 तास येथे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.  
 
अपघातानंतर अजिंठा पोलीस घटना स्थळी जवळपास सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पोहोचले. तर 5 तासानंतर सकाळी 10 वाजता क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त ट्रक हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. यानंतर दुपारी 12 वाजता येथील वाहतूक सुरळीत झाली. या अपघातात जखमी झालेले दोघंही गुजरातमधील रहिवासी आहेत. जखमींवर अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन त्यांना औरगाबाद येथे पाठवण्यात आले आहे.
 
फळ-भाजीपाल्याने भरलेला ट्रक (क्रमांक जी.जे.19- यू 3452)  भुसावळहून पुणे येथे जात होता. शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास या ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झाला. त्यामुळे रस्त्याशेजारी चालक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होते.  
यादरम्यान, औरंगाबादहून  जळगावच्या दिशेने येणा-या भरधाव ट्रकची ( क्रमांक एम एच 28- बी 8055) तेथे उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास ठप्प झाली होती.
 
अजिंठा पोलीस अडीच तासानंतर घटनास्थळी दाखल 
घटनास्थळापासून पोलीस ठाणे 2 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र अपघाताची माहिती  पोलिसांना उशीरा मिळाली. परिणामी पोलीस घटनास्थळी सकाळी 7:30 वाजता दाखल झाले.  तर नेहमी हप्ते जमा करत फिरणारे वाहतूक पोलीस 8 वाजता घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे 7 तास  तात्कळत बसावे लागले, असा संताप प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
 

Web Title: A traffic accident due to an accident in Ajantha Ghat in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.