‘एक्स्प्रेस वे’वर वाहतूककोंडी

By admin | Published: May 1, 2017 03:01 AM2017-05-01T03:01:48+5:302017-05-01T03:01:48+5:30

शनिवार, रविवारला जोडून आलेल्या १ मे महाराष्ट्र दिन, कामगार दिनाची सुटी जोडून आल्याने रविवारी मोठ्या संख्येने

Traffic drivers on 'Express Way' | ‘एक्स्प्रेस वे’वर वाहतूककोंडी

‘एक्स्प्रेस वे’वर वाहतूककोंडी

Next

लोणावळा : शनिवार, रविवारला जोडून आलेल्या १ मे महाराष्ट्र दिन, कामगार दिनाची सुटी जोडून आल्याने रविवारी मोठ्या संख्येने मुंबईकर पर्यटक खासगी वाहनांनी घराबाहेर पडले. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. वाहनांची प्रचंड गर्दी वाढल्याने रविवारी भल्या पहाटेपासून एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या तब्बल सहा ते सात किमी अंतरापर्यत रांगा लागल्या होत्या. इतर कसलाही अडथळा नसतानाही केवळ वाहनांची संख्या वाढल्यानर अतिशय संथ गतीने वाहतुक सुरु होती. त्यामुळे दिवसभर कासवाच्या गतीने रहदारी सुरु होती.
एक्स्प्रेस वेवर खालापुर टोलनाका ते अमृतांजन पुल दरम्यान ही वाहतूककोंडी झाली. शनिवारीही दिवसभर हिच स्थिती होती. सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात ऊष्णता वाढली असल्याने सलग सुट्यांचा फायदा घेत पर्यटक कुटुंबासह थंड हवेच्या ठिकाणांकडे धाव घेत आहेत. लोणावळ्याकडे येणाऱ्या सर्वच मार्गावर वाहनांची गर्दी होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होती. लोणावळा, कोल्हापुर, माथेरान, शिर्डी आदी भागात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी होती. (वार्ताहर)

भल्या पहाटे घराबाहेर पडूनही हजारों पर्यटकांना रविवारचा बराचसा दिवस या वाहतूककोंडीतच घालवावा लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोणावळा शहरात पर्यटक संख्या वाढल्याने सर्वच रस्ते व पर्यटनस्थळे संख्येने गजबजली होती. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावरही दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतुक कर्मचारी दिवसभर वाहतुक सुरळीत करण्यासाठी भर ऊन्हात चौकात तैनात होते.

Web Title: Traffic drivers on 'Express Way'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.