दु्रतगती महामार्गावर वाहतूककोंडी

By Admin | Published: May 29, 2016 12:39 AM2016-05-29T00:39:06+5:302016-05-29T00:39:06+5:30

मे अखेरचा शनिवार व रविवारची सुटी एन्जॉय करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक घराबाहेर पडल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी झाली. मुंबईहून

Traffic highway on the highway | दु्रतगती महामार्गावर वाहतूककोंडी

दु्रतगती महामार्गावर वाहतूककोंडी

googlenewsNext

लोणावळा : मे अखेरचा शनिवार व रविवारची सुटी एन्जॉय करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक घराबाहेर पडल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी झाली. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर अमृतांजन पुलापासून शिंगरोबाच्या घाटापर्यंत म्हणजे जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. अर्धा दिवस हा वाहतूककोंडीतच गेल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. जूनमध्ये शाळा सुरू होणार आहेत. पावसालादेखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे मे अखेरचा शनिवार व रविवार एन्जॉय करण्यासाठी पर्यटक कुटुंबीयांसमवेत खासगी वाहनांनी घराबाहेर पडले. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने द्रुतगती मार्ग अक्षरश: कासवगती झाला होता. कसलाही अडथळा नसतानादेखील केवळ वाहनांची संख्या वाढल्याने द्रुतगती महामार्ग संथगती बनल्याचे चित्र दिवसभर होते. लोणावळ्यात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरही दुतर्फा गर्दी झाली होती. लोणावळ्यातील अंतर्गत रस्ते व भुशी धरण, लायन्स पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावरदेखील वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूककोंडी झाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Traffic highway on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.