मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कसा-याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

By admin | Published: June 24, 2015 01:20 PM2015-06-24T13:20:24+5:302015-06-24T13:24:02+5:30

बुधवारी दुपारी कसा-याजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कसा-याच्या दिशेने जाणारी वाहतूक तासाभरापासून ठप्प झाली.

Traffic jam in the direction of the goods train shutdown | मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कसा-याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कसा-याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २४ - पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतानाच बुधवारी दुपारी कसा-याजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कसा-याच्या दिशेने जाणारी वाहतूक तासाभरापासून ठप्प झाली आहे.

मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणा-या मालगाडीचे इंजिन उंबरवाडीजवळ बंद पडले. बुधवारी दुपारी १२ ते १२.१५ दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर ती मालगाडी पुढे नेण्यासाठी रेल्वे अधिका-यांनी दुसरे इंजिन बोलावले. मात्र ते येईपर्यंत तब्बल एक तास कसा-याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. रेल्वेसेवा अद्यापही विस्कळीत आहे.

पावासमुळे रोजच रेल्वेचा गोंधळ सुरू असताना आज इंजिन बंद पडल्याने लोकलसेवेवर परिणाम झाला आणि प्रवाशांच्या मनस्तापात आणखीनच भर पडली. 
 

Web Title: Traffic jam in the direction of the goods train shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.