तूर खरेदीची वाहतूक मर्यादा आता १२० किमी

By admin | Published: March 11, 2017 12:44 AM2017-03-11T00:44:57+5:302017-03-11T00:44:57+5:30

राज्यात चांगला पाऊस झाल्याने तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. किमान आधारभूत दराने तूरीची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापूर्वी तूर खरेदी केंद्रांची

The traffic limit for purchase of tur will now be 120 kms | तूर खरेदीची वाहतूक मर्यादा आता १२० किमी

तूर खरेदीची वाहतूक मर्यादा आता १२० किमी

Next

मुंबई : राज्यात चांगला पाऊस झाल्याने तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. किमान आधारभूत दराने तूरीची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापूर्वी तूर खरेदी केंद्रांची मर्यादा ५० किमी अंतराची होती. आता ती वाढवून १२० किमीपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आता २ लाख १३ हजार मेट्रीक टन तूर साठवणूक करता येणे शक्य होणार आहे.
खरेदी केंद्रांपासून ५० किमी परिसरात तूर साठवणुकीची मर्यादा होती. त्या -त्या भागातील राज्य वखार महामंडळाची गोदामे भरली असल्यामुळे राज्य शासनाने केंद्राला वाहतूक मर्यादेत वाढ करण्याची विनंती केली होती. त्यानुसार केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाने खरेदी केंद्रापासून १२० किमी अंतरापर्यंत साठवणुकीसाठी तूर वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: The traffic limit for purchase of tur will now be 120 kms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.