फाटक वेळेत बंद न झाल्यानं ठाकुर्लीत रेल्वे फाटकात वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 07:32 PM2017-10-21T19:32:35+5:302017-10-21T19:33:25+5:30

ठाकुर्लीत नेहमीप्रमाणे रेल्वे फाटक उघडल्यानंतर वेळेत बंद न झाल्याने रेल्वे वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. सकाळी आणि दुपारच्या वेळेत दोन वेळा ही समस्या भेडसावली.

 Traffic movement in the rail fart in Thakurli due to not being closed in the gate | फाटक वेळेत बंद न झाल्यानं ठाकुर्लीत रेल्वे फाटकात वाहतूक कोंडी

फाटक वेळेत बंद न झाल्यानं ठाकुर्लीत रेल्वे फाटकात वाहतूक कोंडी

Next

डोंबिवली - ठाकुर्लीत नेहमीप्रमाणे रेल्वे फाटक उघडल्यानंतर वेळेत बंद न झाल्याने रेल्वे वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. सकाळी आणि दुपारच्या वेळेत दोन वेळा ही समस्या भेडसावली. रेल्वे फाटक उघडल्यानंतर शहराच्या दुतर्फा जाणारी वाहने एकदम रेल्वे रुळांमध्ये येतात, पण त्या वाहनांना पूर्व-पश्चिम बाहेर पडण्यासाठी मात्र चिंचोळी जागा असल्याने कोंडीत वाढ होते.

फाटक अल्पावधीत बंद होणार असल्याने वाहनचालक घाई करत वाहने ट्रॅकमध्ये आणतात, त्यामुळे सगळा गोंधळ होतो. शनिवारीही ही समस्या उद्भवल्याने वाहनचालक हैराण झाले होते, परिणामी फाटक उघडे राहिल्याने प्रवाशांनाही त्याचा त्रास झाला. ही समस्या रोजचीच असल्याने रेल्वे प्रशासन फाटकांमधून वाहने बाहेर काढण्यात व्यस्त असतात. ठाकुर्ली उड्डाणपूलाचे काम झपाट्याने व्हावे हा एकमेव पर्याय असल्याचे रेल्वे कर्मचा-यांनी स्पष्ट केले. पर्याय नसल्याने ही कोंडी सुटत नसल्याने समस्या उद्भवत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title:  Traffic movement in the rail fart in Thakurli due to not being closed in the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.