पालिकेच्या खोदकामामुळे वाहतुकीस अडथळा

By Admin | Published: September 21, 2016 03:17 AM2016-09-21T03:17:42+5:302016-09-21T03:17:42+5:30

नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या चारफाटा येथील पाइप लाइन लिकेज झाल्याने काही घरांना पाणीपुरवठ्यात अडथळा येत होता

Traffic obstruction due to the digging of the corporation | पालिकेच्या खोदकामामुळे वाहतुकीस अडथळा

पालिकेच्या खोदकामामुळे वाहतुकीस अडथळा

googlenewsNext


उरण : नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या चारफाटा येथील पाइप लाइन लिकेज झाल्याने काही घरांना पाणीपुरवठ्यात अडथळा येत होता. मात्र जुनी पाइप लाइन काढून नवीन पाइप लाइन टाकण्यासाठी चारफाटा येथे मच्छीमार्केटला लागूनच सरळ रस्त्यात लागून खोदकाम केले गेले. त्यामुळे या खोदकामामुळे नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाइप लाइन टाकण्याचे काम सुरू असून जेसीबी लावून माती उत्खनन करून बाजूला टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असून अगोदरच शहरात वाहतूक कोंडीची समस्या उभी असताना या खोदकामामुळे विशेषत: संथ सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. अनेक वाहनांना येता-जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे खड्ड्यात पडून एखाद्याला गंभीर इजा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी तर येथून जाताना अधिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
>हे काम दोन दिवसांचे असून जोरदार पावसामुळे काम थांबविण्यात आले होते मात्र आता हे काम हाती घेतले आहे. हे काम त्वरित पूर्ण करून पाइप लाइनचे काम पूर्ण होताच खोदलेले खड्डेही बुजविण्यात येतील.
- जगदीश म्हात्रे,
पाणीपुरवठा विभाग प्रमुख
उरण नगर परिषद

Web Title: Traffic obstruction due to the digging of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.