पावसाळ्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज

By admin | Published: June 11, 2016 01:57 AM2016-06-11T01:57:51+5:302016-06-11T01:59:20+5:30

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झालेले असून मुंबई वाहतूक पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे

Traffic police ready for monsoon | पावसाळ्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज

पावसाळ्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज

Next


मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झालेले असून मुंबई वाहतूक पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाणी तुंबून वाहतूककोंडी होत असल्याने अशा जवळपास १५0 ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
पावसाळ््यात ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा ठप्प होते. त्यामुळे अनेक जण पावसाळ्यात रस्ते वाहतुकीवर अवलंबून असतात. मात्र रस्त्यावरील खड्डे आणि पाणीही तुंबल्याने वाहनांचा वेग कमी होतो. परिणामी, अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होते. अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कृती आराखडा तयार केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत वाहने दुसऱ्या मार्गाने वळविण्याची व पार्किंग करण्यासाठीही जागा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांचे जवळपास साडेतीन हजार एवढे मनुष्यबळ असून सध्या मात्र अडीच ते तीन हजार कर्मचारीच वाहतूक हाताळण्यासाठी तैनात केले जातात. आवश्यकता भासल्यास अन्य कर्मचाऱ्यांचा वापर होतो. मात्र पावसाळ्यात सर्व मनुष्यबळ वापरण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)

वाहतूक पोलिसांना सूचना
विभागीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक आपल्या गस्ती वाहनांत मार्गदर्शक फलक, प्रथमोपचार पेटी, एलईडी, नायलॉन दोरखंड ठेवतील. 
रेल्वे, बस सेवा खंडित होणे, मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण होणे अशा परिस्थितीत वाहतूक अधिकारी आणि अंमलदार यांनी येणारे व जाणारे ट्रक, टेम्पो व इतर वाहने थांबवून त्यात पीडित प्रवाशांना बसवावे.
पाण्यात अडकलेल्या किंवा इतर कारणास्तव बंद पडून वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने विभागीय गस्ती वाहनांच्या के्रनची वाट न पाहता दोर किंवा वाहने ओढण्याकरिता वापरात येणाऱ्या साखळीचा वापर करून स्वत: बाजूला करावीत.
विभागीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांनी आपल्या विभागातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक यांची नेमणूक करण्याचे आदेश.
वाहतूक नियंत्रण कक्षानेही सज्ज राहावे. साहाय्यक पोलीस आयुक्त, नियंत्रण कक्ष यांनी पालिकेशी संपर्कात राहावे. 
विभागीय अधिकाऱ्यांनी साहाय्यक पोलीस आयुक्त (मोटार वाहने) व पोलीस निरीक्षक (बिनतारी संदेश) यांच्याही संपर्कात राहून वाहने व बिनतारी संच यांची दुरुस्ती नियमित होऊन ते चालू स्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
>जवळपास १५0 पेक्षा जास्त ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. यातील काही महत्त्वाची ठिकाणे वाहतूक विभागवारीप्रमाणे 
वडाळा - नवाब टँक ब्रिज, शिवडी फाटक, वडाळा पूल लाइट सिग्नल.
नागपाडा - मौलाना शौकत अली मार्ग, मराठा मंदिर
भायखळा - बावला कंपाउंड, काळाचौकी सिग्नल सरदार हॉटेल, पॅलेस सिनेमासमोर. 
भोईवाडा - परेल टी जंक्शन, हिंदमाता, शिरोडकर मंडई.
वरळी - डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड, गणतराव कदम मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग. 
पायधुनी - जे.जे. रोड, आय.आर. रोड, जे.जे. उड्डाणपूल.
माटुंगा - दादर टी.टी. सर्कल, एल.जे. रोड, एल.एन. रोड माटुंगा, किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली, वडाळा पूल.
माहीम - माहीम जंक्शन, माहीम कॉजवे. 
दादर - सेंचुरी बाजार, एलफिन्स्टन जंक्शन, परेल एसटी डेपो. 
मानखुर्द - मानखुर्द टी जंक्शन.
कुर्ला - कुर्ला गार्डन, कुर्ला डेपो जंक्शन, कमानी जंक्शन, कुर्ला रेल्वे स्टेशन. 
चेंबूर - सायन जंक्शन, आरसीएफ सर्कल.
मुलुंड - जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीजवळ, शक्ती पार्क, भांडुप सोनापूर जंक्शन.
ट्रॉम्बे - बी.ए.आर.सी. मेन गेट, माहुल रोड, ट्रॉम्बे गाव. 
घाटकोपर - प्रीमियर रोड, जॉली जिमखान्याजवळ.
विक्रोळी - दामोदर पार्क, गांधीनगर जंक्शन पुलाखाली.
साकीनाका - साकी विहार रोड, गुप्ता पेट्रोल, रिलायन्स आॅफिसजवळ.
दिंडोशी - महानंद मिल्क डेअरी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, आरे रोड चेकनाका.
सांताक्रूझ - खिरा नगर ते मिलन सब-वे, सांताक्रूझ बस डेपोसमोर. 
वाकोला - वाकोला ब्रिज सुरू होताच, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सेंटॉर जंक्शन.
मालाड - नटराज मार्केट, मालाड सब-वे.
डी.एन. नगर - एस.व्ही. रोड, ओशिवरा ब्रिज.
वांद्रे - बडा मस्जिदसमोर, नॅशनल कॉलेज जंक्शन, वांद्रे-वरळी सी-लिंक रोड, खार सब वे, रेल्वे कॉलनी.
कलिना - कुर्ला रोड, नेहरू रोड. 
जोगेश्वरी - सहार, अंधेरी सब-वे.
कांदिवली - पोयसर डेपोजवळ, एम.जे. रोड. 
दहिसर - श्रीकृष्ण नगर, दहिसर पूर्व, दत्तपाडा रोड, कोकणीपाडा, आंबावाडी.

Web Title: Traffic police ready for monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.