जुहू-पार्ले परिसरातील वाहतुकीवर निर्बंध
By Admin | Published: August 24, 2016 01:44 AM2016-08-24T01:44:55+5:302016-08-24T01:44:55+5:30
२६ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली
मुंबई : गोकुळाष्टमीच्या निमित्ताने श्री हरे राम हरे कृष्ण मंदिर जुहू, विलेपार्ले (पश्चिम) परिसरात २४ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजल्यापासून २६ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या कालावधीत जनार्दन म्हात्रे रोड, जुहू चर्च रोड, गांधी ग्राम रोड, अल्फ्रेडो क्रियाडो मार्ग, संत ज्ञानेश्वर मार्ग, श्यामराव परुळेकर मार्ग (एन.एस. रोड नं. १३) या रस्त्यांवर गाड्या उभ्या करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मुक्तेश्वर देवालय मार्गावर चांडोक चौकपासून (उत्तरेकडून दक्षिणेकडे) आपत्कालीन सेवेची वाहने, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व स्थानिक रहिवाशांच्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना, मुक्तेश्वर देवालय मार्गावर चांडोक चौकपासून (दक्षिणेकडून उत्तरेकडे) सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील. तर श्यामराव परुळेकर मार्ग (एन.एस. रोड नं. १३) वरून संत ज्ञानेश्वर मार्गाकडे जाणारे डावे वळण, देवळे रोड व संत ज्ञानेश्वर रोड जंक्शन येथे (पूर्वेकडून पश्चिमेकडे) वाहतुकीस बंद राहील.
मुक्तेश्वर देवालय मार्ग व देवळे रोड जंक्शनकडून (पश्चिमेकडून पूर्वेकडे) जेव्हीपीडी जंक्शनकडे जाणारा मार्ग व बाळकृष्ण जुईकर मार्ग (डीबीजे) हा संत ज्ञानेश्वर मार्गाकडून (पीव्हीआर सिनेमापासून) मुक्तेश्वर देवालय मार्ग (गांधी शिक्षण भवन पर्यंत) हे मार्ग वाहतुकीस एक दिशा राहतील, असेही जाधव यांनी कळविले आहे.
वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी जुहू, विलेपार्ले पश्चिम येथील गांधीग्राम रोडवर मुक्तेश्वर मंदिर ते मलकानी हाऊसपर्यंत २४ तास नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. गांधीग्राम रोडवर मलकानी हाऊस ते रिवेरा बिल्डिंगपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना सम-विषम दिनांकास एकाच बाजूस वाहने उभी करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे अपर पोलीस आयुक्त सुनील पारसकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी
>‘सम-विषम’ परवानगी
जुहू, विलेपार्ले पश्चिम येथील गांधीग्राम रोडवर मुक्तेश्वर मंदिर ते मलकानी हाऊसपर्यंत २४ तास नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. गांधीग्राम रोडवर मलकानी हाऊस ते रिवेरा बिल्डिंगपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना सम-विषम दिनांकास एकाच बाजूस वाहने उभी करण्यास परवानगी देण्यात
येत आहे.