अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन आवश्यक, परिवहन मंत्री दिवाकर रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 05:04 AM2018-05-09T05:04:12+5:302018-05-09T05:04:12+5:30
देशभरातील अपघाती राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा असलेल्या महाराष्ट्रात अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन सजग आणि संवेदनशीलपणे करणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती परिवहन मंत्री आणि राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केली. रस्ता सुरक्षा पंधरवडा सांगता सोहळयात मंत्री रावते मुंबईत बोलत होते.
मुंबई : देशभरातील अपघाती राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा असलेल्या महाराष्ट्रात अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन सजग आणि संवेदनशीलपणे करणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती परिवहन मंत्री आणि राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केली. रस्ता सुरक्षा पंधरवडा सांगता सोहळयात मंत्री रावते मुंबईत बोलत होते.
परिवहन विभागामार्फत रस्ते सुरक्षा पंधरवडा राबविण्यात आला. मंगळवारी या पंधरवड्याचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार हे उपस्थित होते.
यावेळी मंत्री रावते म्हणाले की, ग्रामीण भागात दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याबरोबर दुचाकींच्या अपघातांची आणि त्यात मृत्यूमुखी पडणाºयांची संख्याही वाढली आहे. हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनांमध्ये आसन सुरक्षा पट्टाचा (सीटबेल्ट) वापर यासारख्या छोट्या उपाययोजनांचा अवलंब केला तरी अपघातातील जिवीतहानी टाळता येईल. यासाठी जनतेने संवेदनशीलतेने आणि सजगपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
देशभरात रस्ते अपघातात दरवर्षी सव्वा ते दिड लाख लोकांचा मृत्यू होतो. देशाच्या मनुष्यबळाची ही फार मोठी हानी आहे. आपल्या देशात जगातील फक्त ०२ टक्के वाहने आहेत. पण जगातील १० टक्के रस्ते अपघात आपल्या देशात होतात.
हे कोणत्याही परिस्थितीत रोखणे आवश्यक असून यासाठी वाहनचालकांनी रस्ते नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे मत परिवहव विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांनी मांडले.
वाहनांच्या हॉर्नमुळे होणारे ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी कार्य केल्याबद्दल या सांगता कार्यक्रमात पश्चिम रेल्वेचे सहाय्यक व्यवस्थापक विद्याधर मालेगावकर यांनाही मंत्री रावते यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
‘समृद्धी’ महामार्गावर रस्ते सुरक्षेची अंमलबजावणी
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची बांधणी करताना रस्ते सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आल्याचे मंत्री रावते यांनी सांगितले.
विनाअपघात वाहन चालविणाºया वाहनचालकांचा सत्कार
रस्ता सुरक्षेसाठी कार्य करणाºया विविध स्वयंसेवी संस्था, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा मंत्री रावते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वेस्टर्न इंडीया आॅटोमोबाईल असोसिएशनचे नितीन डोसा, आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली, सीएएसआयचे परेश सेठ आणि मितेश सेठ, वी कॅनच्या इंद्राणी मलकानी, राधी फाउंडेशनचे आसीफ रेशमवाला यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
सार्वजनिक वाहतुकीतील अधिकाºयांचा गौरव
सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत विना अपघात वाहन चालविणाºया वाहनचालकांचाही सांगता कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यात बेस्टचे सखाराम मेतकरी (मागाठाणे आगार), संजय जाधव (मागाठाणे आगार), रामशिष यादव (विक्रोळी आगार), एसटी महामंडळाचे उमर खान रहिम खान (बीड आगार), सदाशिव खवरे (आजरा आगार, जि. कोल्हापूर), मोहम्मद हुसेन लाल मोहम्मद (चिखली आगार, जि. बुलढाणा) यांना गौरविण्यात आले.