कसारा घाटात वाहतूककोंडी

By admin | Published: January 18, 2016 03:17 AM2016-01-18T03:17:35+5:302016-01-18T03:17:35+5:30

मुंबई-नाशिक मार्गावर झालेल्या दोन अपघातांमुळे प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कसाऱ्यातील साई खिंडीत गॅस टँकर उलटला, तर ओहळाचीवाडी येथे मक्याचा कंटेनर पलटी झाला.

Traffic traffic in the Kasara Ghat | कसारा घाटात वाहतूककोंडी

कसारा घाटात वाहतूककोंडी

Next

कसारा : मुंबई-नाशिक मार्गावर झालेल्या दोन अपघातांमुळे प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कसाऱ्यातील साई खिंडीत गॅस टँकर उलटला, तर ओहळाचीवाडी येथे मक्याचा कंटेनर पलटी झाला.
पहिल्या घटनेत उरण येथून गॅस भरून जळगावला निघालेल्या गॅस टँकरला साई खिंडीत दोन कार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यात, या गॅस टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो नाल्यात पलटी झाला. गॅस भरलेला असल्याने पलटी झालेल्या टँकर धोकादायक ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे वाहतूक रोखण्यात आली. दरम्यान, शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर, पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेत तज्ज्ञांकडून याबाबत खात्री केली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दुपारी दोनच्या सुमारास के्रनच्या साहाय्याने टँकर उचलण्यात आला. त्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली.
दुसऱ्या घटनेत जळगावहून मका घेऊन जाणारा भरधाव कंटेनर कसारा घाट उतरून ओहळाचीवाडी येथे वळण घेत असताना उलटला. दारूच्या नशेत असलेला कंटेनरचालक अनिल यादव याचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याचे निदर्शनास आले. भररस्त्यात कंटेनर पलटी झाल्याने नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प होती. अपघातस्थळी कसारा पोलीस, घोटी व शहापूर महामार्ग पोलिसांसह गस्त पथकाने धाव घेतली. वाहतूककोंडी झाल्याने क्रेन आणण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गिनाके व राठोड पुढील तपास करीत आहेत.चेकपोस्टवरील कर्मचारी बचावले
भरधाव कंटेनर सुरुवातीला चिंतामणवाडी येथील चेकपोस्टवरील बॅरिकेड्स तोडून १०० फुटांवर पलटी झाला. चेकपोस्टवरील कर्मचारी थोडक्यात बचावले. कंटेनर पलटी होण्याच्या काही सेकंदांपूर्वी दोन कार कंटेनरला ओव्हरटेक करून पुढे गेल्याने त्याही बचावल्या.

Web Title: Traffic traffic in the Kasara Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.