मांजराच्या खवल्यांची तस्करी

By Admin | Published: July 24, 2015 11:23 PM2015-07-24T23:23:05+5:302015-07-25T01:13:32+5:30

टोळी जेरबंद : बोलेरो गाडीसह ४० किलो ३०० ग्रॅम खवले जप्त; सर्व संशयित बेळगाव, कारवार परिसरातील

Trafficking of cats | मांजराच्या खवल्यांची तस्करी

मांजराच्या खवल्यांची तस्करी

googlenewsNext

चिपळूण : नवीन बोलेरो गाडीतून खवल्या मांजरांच्या खवलांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती शिरगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी कुंभार्ली घाटातील तपासणी नाका येथे गुरुवारी रात्री १०.४५ वाजता बोलेरो गाडी पाच आरोपींसह जप्त केली. दुर्धर त्वचा रोगावरील औषधे, बुलेटप्रुफ जाकीटासह देवदेवस्कीसाठी या खवल्यांचा वापर होत असल्याने ते महाग आहेत आणि त्यामुळेच त्याची तस्करी केली जाते.ओवळी परिसरात न्यायालयाचे समन्स बजावण्यासाठी गेलेल्या हवालदार राजेंद्र देसाई व प्रकाश शिंदे यांना खवले मांजराची खवले (पँगोलिन) एका बोलेरो गाडीतून (केए २२ झेड ७८६१) कऱ्हाडच्या दिशेने नेली जात असल्याची माहिती मिळाली. हवालदार देसाई यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना तत्काळ ही माहिती दिली. त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे, चालक प्रभाकर साळवी, वैभव जाधव, रमाकांत शिंदे, डी. के. जाधव, एस. टी. पवार, पी. बी. शिंदे यांनी सापळा रचला. सायंकाळी चार वाजेपर्यंत आरोपी घाटाकडे आले नाहीत. मात्र, तरीही पोलिसांनी आपली ‘फिल्डिंग’ कायम ठेवली. रात्री १०.४५ च्या सुमारास बोलेरो गाडी घाटामध्ये आली. नवीनच दिसणारी ही गाडी पोलिसांनी तपासणीकरिता थांबविली. गाडीमध्ये सीटखाली वेगवेगळे कप्पे करून त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत खवले (पँगोलिन) असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी गाडीतील पाचही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. जप्त केलेली गाडी आणि खवले यांची किंमत सुमारे २७ लाख २४ हजार ३०० रुपये होते. याप्रकरणी सागर दत्तात्रय कदम (वय २७, रा. वडगाव, बेळगाव), रिझवान बाबासाहेब सय्यद (३२, रा. वडगाव, बेळगाव), प्रमोद दत्तात्रय कदम (३२, रा. वडगाव, बेळगाव), (पान ७वर)

खवल्यांचा वापर नेमका कशासाठी?
खवल्या मांजराचे खवले (पँगोलिन) हे दुर्धर त्वचा रोगावरील औषधे बनविण्यासाठी, बुलेटप्रुफ जाकीट बनविण्यासाठी तसेच देवदेवस्की, जादूटोण्यासाठीही वापरले जाते. त्यामुळे त्याची किंमत जास्त असते. वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९, ५१ अन्वये याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी वन खात्याचे सहकार्य घेतले जात आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.
खवल्यांना परदेशातही मागणी
खवल्या मांजर हा प्राणी वाघासारखा अतिशय महत्त्वाचा व दुर्मीळ प्राण्यांच्या घटकात गणला जातो. अनुसूची क्र.१ मध्ये त्याचा समावेश असतो. त्याच्या खवल्योचा औषधांसाठी वापर केला जात असल्याने त्याची खवले अव्वाच्या सव्वा दराने बाजारात विकली जातात. परदेशात त्याला चांगली मागणी असते, असे प्रभारी परिक्षेत्र वनअधिकारी शहाजी पाटील यांनी सांगितले.

Web Title: Trafficking of cats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.