भरधाव ट्रेलरने पाच महिला शेतमजुरांना चिरडले

By admin | Published: August 12, 2014 07:15 PM2014-08-12T19:15:48+5:302014-08-12T19:26:18+5:30

अकोल्यानजिक भीषण अपघातात पाच वर्षिय चिमुकल्याचाही मृत्यू; ट्रेलर जाळला

The trailer collided with five women's laborers | भरधाव ट्रेलरने पाच महिला शेतमजुरांना चिरडले

भरधाव ट्रेलरने पाच महिला शेतमजुरांना चिरडले

Next

अकोला: रस्त्याच्या कडेने जाणार्‍या पाच महिला शेतमजुरांना भरधाव ट्रेलरने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी राष्ट्रीय महार्गावरील अकोलानजिक असलेल्या कोळंबी येथे घडली. या अपघातात एका पाच वर्षीय चिमुकल्याचाही मृत्यू झाला असून, या घटनेने संतापलेल्या जमावाने ट्रेलरची जाळपोळ करून, महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प पाडली. छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्हय़ातून विजेचे खांब घेऊन सीजी 0७ सीए ३0५७ क्रमांकाचा ट्रेलर अकोल्याकडे येत होता. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर सोडल्यानंतर, कोळंबीनजिक चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी कोळंबी येथील पाच महिला शेतमजुर रस्त्याच्या कडेने गावातीलच एका शेतामध्ये कामासाठी जात होत्या. त्यापैकी एका महिला मजुराच्या समवेत तिचा पाच वर्षांचा मुलगाही होता. सहाही जण महामार्गाच्या उजव्या बाजूने जात असताना, ट्रेलरने मागून जबर धडक देऊन, त्यांना अक्षरश: फरफटत नेले. सकाळी ८.४५ वाजता झालेल्या या अपघातात पाचही महिला आणि चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमूळे संतप्त झालेल्या परिसरातील दाळंबी, कोळंबी व मिर्जापूर येथील गावकर्‍यांनी महामार्गावर तीन तास रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर, महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. या अपघातात कोळंबी येथील शेतमजूर ताई गणेश इंगोले(२५), तिचा मुलगा गौरव (५), रेखा संजय तळोकार (३५), सुनीता रमेश देवके (३५), नंदा मोतीराम गाडगे (३५) आणि कु. विजया हरिदास मानकर (१८) यांचा मृत्यू झाला.

** संतप्त ग्रामस्थांनी जाळला ट्रेलर

अपघातानंतर ट्रेलरच्या चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी कुरणखेड फाट्याजवळ ट्रेलर अडवला. शेकडो ग्रामस्थांचा जमाव पाहून चालक ट्रेलर सोडून पळून गेला. जमावाने ट्रेलर जाळून संपात व्यक्त केला.

** महामार्गावर वाहनांच्या रांगा

अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावरील वाहतूक तीन तास रोखून धरली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बोरगाव मंजू पोलिसांनी ग्रामस्थांनी समजूत काढून, १२.३0 वाजताच्या सुमारास महामार्ग मोकळा केला.

** ट्रेलर चालक पोलिसांना शरण

अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रेलरचा चालक अमरजितकुमार शिवपारससिंग यादव (वय २७, रा. भिलई, छत्तीसगढ) याने बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात जाऊन अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Web Title: The trailer collided with five women's laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.