बॉम्बशोधक पथकाकडून रेल्वेगाड्यांची तपासणी

By admin | Published: January 4, 2016 03:09 AM2016-01-04T03:09:28+5:302016-01-04T03:09:28+5:30

दिल्ली येथून नगरला येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकांनी रविवारी दिवसभर तपासणी केली.

Train inspection by the bomb detection squad | बॉम्बशोधक पथकाकडून रेल्वेगाड्यांची तपासणी

बॉम्बशोधक पथकाकडून रेल्वेगाड्यांची तपासणी

Next

अहमदनगर : दिल्ली येथून नगरला येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकांनी रविवारी दिवसभर तपासणी केली. झेलम आणि गोवा एक्स्प्रेसची पोलिसांनी कसून तपासणी केली. या रेल्वेगाड्यांमध्ये संशयास्पद काहीही आढळून आले नाही, असे पथकांनी सांगितले.
पठाणकोट येथे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या विशेष दक्षता घेतली जात आहे, तसेच रविवारी दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अज्ञात इसमाने धमकीचा ई-मेल पाठविला होता. दिल्लीहून कानपूरला जाणारी गाडी उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली होती. दिल्ली येथून निघालेल्या सर्व रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात आली. बॉम्बशोधक पथक आणि श्वानपथक शिरल्याने प्रवाशांचीही धांदल उडाली. या तपासणीमुळे रेल्वेगाड्यांचे नियोजित वेळापत्रकही विस्कळीत झाले.

Web Title: Train inspection by the bomb detection squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.