होळीनिमित्त कोकणासाठी गाड्या
By admin | Published: March 10, 2017 02:10 AM2017-03-10T02:10:53+5:302017-03-10T02:10:53+5:30
होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने १00 जादा बसेस आणि मध्य तसेच कोकण रेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने १00 जादा बसेस आणि मध्य तसेच कोकण रेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरूनगर या बस स्थानकातून बसेस सुटतील. मुंबई सेंट्रल येथून दापोली, गुहागर, देवरुख, खेड, कासेपेडांबे, शेवते, बुरुंबेवाडी, मेढे व पिंपळोली या ठिकाणांसाठी बस सोडण्यात येतील. परळमधून खेड-दापोली आंजर्ले, मासरंग, भातगाव आणि कुर्ला नेहरूनगर येथून गुहागर, चिपळूण आणि दापोलीसाठी बस सोडल्या जातील. याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा या भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठीही या शुक्रवारी व शनिवारी ५0 जादा बस सुटतील. मध्य व कोकण रेल्वेकडून सीएसटी ते करमाळीसाठी दोन ट्रेन या १२ मार्च रोजी सोडण्यात येणार आहेत. सीएसटी ते सावंतवाडी रोडसाठीही सहा ट्रेन धावतील. ११, १२ आणि १३ मार्च रोजी या ट्रेन सुटतील. सीएसटी ते यशवंतपूर अशी १३ मार्च
रोजी सीएसटीतूनच ट्रेन सोडली जाईल. (प्रतिनिधी)