राज्यातील ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:28 AM2018-06-06T01:28:01+5:302018-06-06T01:28:01+5:30
राज्य शासनाने आज ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. अनुप यादव हे नवे आदिवासी आयुक्त (नाशिक) असतील. जालना जिल्हाधिकारी म्हणून ए.आर.काळे यांना पाठविण्यात आले असून बी.जी.पवार हे राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे (मुंबई) नवे व्यवस्थापकीय संचालक असतील.
मुंबई : राज्य शासनाने आज ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. अनुप यादव हे नवे आदिवासी आयुक्त (नाशिक) असतील.
जालना जिल्हाधिकारी म्हणून ए.आर.काळे यांना पाठविण्यात आले असून बी.जी.पवार हे राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे (मुंबई) नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. या महामंडळात असलेले ए.एन.कारंजकर यांची बदली भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली. भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले मनोज सूर्यवंशी यांची बदली ठाणे येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी केली. माधवी खोडे-चावरे यांची नियुक्ती वस्रोद्योग संचालकपदी (नागपूर) केली आहे. आतापर्यंत या संचालक पदावर असलेले संजय मिना यांची बदली नाशिक येथे आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी केली आहे. नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल हे भंडाराचे नवे जिल्हाधिकारी असतील. भंडाराचे जिल्हाधिकारी एस.के.दिवसे यांना नागपूर पालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी पाठवले आहे. संजय यादव हे नागपूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. या आधी ते ठाणे येथे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त (ठाणे) होते. कमलाकर फंड यांची बदली उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात (मंत्रालय) सहसचिवपदी करण्यात आली आहे.