IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; विश्वास नांगरे पाटील ACB मध्ये, तर मिलिंद भारंबे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 21:10 IST2022-12-13T21:10:01+5:302022-12-13T21:10:17+5:30
अखेर राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढतीना मुहूर्त मिळाला आहे.

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; विश्वास नांगरे पाटील ACB मध्ये, तर मिलिंद भारंबे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त
मुंबई: अखेर राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढतीना मुहूर्त मिळाला आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात मोठा निर्णय घेतला. यानुसार, सुपरकॉप अशी ओळख असलेले विश्वास नांगरे पाटील यांना एसीबी आडीजी करण्यात आले आहे.
याशिवाय, मिलिंद भारंबे पदोन्नतीवर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त झाले आहेत. अमिताभ गुप्ता यांच्याकडे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची तर कोकणचे आयजी संजय मोहिते यांच्याकडे लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी असेल. सरकारने 15 अधिकाऱ्यांच्या बदल्या तर पाच अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग केल्या असून, त्यांच्या नियुक्तीचे आदेश लवकरच येतील.