बदली करा किंवा घटस्फोट तरी द्या, शिक्षकांची सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 11:48 AM2018-08-30T11:48:56+5:302018-08-30T11:49:24+5:30
एकाच ठिकाणी बदली करा किंवा घटस्फोट तरी द्या अशी मागणी राज्यातील शिक्षकांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मुंबई - एकाच ठिकाणी बदली करा किंवा घटस्फोट तरी द्या अशी मागणी राज्यातील शिक्षक दाम्पत्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. एकमेकांपासून शेकडो मैल दूर राहून विद्यादानाचे काम करणारे हजारो शिक्षण महाराष्ट्रामधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आहेत. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाल्याने वर्षांनुवर्षे एकमेकांपासून दूर राहणाऱ्या शिक्षक पती-पत्नींनी राज्य सरकारला एक निवेदन देऊन आमची एकाच ठिकाणी बदली करा किंवा या दिवाळीला घटस्फोटासाठी सरकारकडे अर्ज देऊ, असा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पती-पत्नी एकत्रीकरण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले आहे. राज्यात शिक्षक पती-पत्नीची जिह्ल्यांतर्गत बदली ही 30 किलोमीटरच्या आत करण्यात यावी असा नियम आहे. मात्र काही शिक्षक दाम्पत्यांच्या बदलीच्या ठिकाणांचे अंतर हे शेकडो किलोमीटर आहे.
राज्यामध्ये अशी अनेक शिक्षक दाम्पत्ये आहेत जी गेल्या 15 वर्षांपासून वेगवेगवेगळ्या ठिकाणी सेवा देत आहेत. इतकी वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केल्यानंतरही एकाच ठिकाणी बदली होत नसल्याने हे शिक्षक आता एवढे संतप्त झालेआहेत की त्यांनी सरकारकडे आपल्याल घटस्फोट देण्याची मागणी केली आहे.