सात आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कोकणच्या विभागीय आयुक्तपदी पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:29 AM2021-07-10T11:29:41+5:302021-07-10T11:30:01+5:30

एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांची बदली अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव म्हणून पाटील यांच्या जागी करण्यात आली आहे.

Transfer of seven IAS officers, Patil as Konkan Divisional Commissioner | सात आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कोकणच्या विभागीय आयुक्तपदी पाटील

सात आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कोकणच्या विभागीय आयुक्तपदी पाटील

googlenewsNext

मुंबई : राज्य सरकारने शुक्रवारी सात आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव व्ही. बी. पाटील हे कोकणचे नवे विभागीय आयुक्त असतील.

एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांची बदली अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव म्हणून पाटील यांच्या जागी करण्यात आली आहे. विमला आर. या नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी असतील. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा हे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे नवे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक असतील. नंदुुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड हे पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे नवे आयुक्त असतील. नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा हे धुळ्याचे नवे जिल्हाधिकारी असतील. आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील अतिरिक्त आयुक्त मनीषा खत्री नंदुरबारच्या नव्या जिल्हाधिकारी असतील.


 

Web Title: Transfer of seven IAS officers, Patil as Konkan Divisional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.