दाेन दिवसांत ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या करा बदल्या, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 05:33 AM2024-08-19T05:33:58+5:302024-08-19T07:42:42+5:30

निवडणुका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोगाकडून निवडणुकांपूर्वी असे बदल्यांचे आदेश निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांना दिले जातात. 

Transfer 'those' officers within two days, Election Commission orders state government | दाेन दिवसांत ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या करा बदल्या, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश

दाेन दिवसांत ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या करा बदल्या, निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, राज्य प्रशासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. निवडणुका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोगाकडून निवडणुकांपूर्वी असे बदल्यांचे आदेश निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांना दिले जातात. 

यात एकाच विधानसभा मतदारसंघात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले अधिकारी तसेच त्याच जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोग देत असते. यावेळीही राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

विशेष म्हणजे, या बदल्या तातडीने करण्याचे आदेश आयोगाने दिले असून, त्यासाठी येत्या मंगळवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात राज्य प्रशासनात मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळतील. महसूल, पोलिस, उत्पादनशुल्क, महापालिका, महामंडळे या विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या होतील. 

कुणाच्या होणार बदल्या?  
एकाच पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेले किंवा गृह जिल्हा असलेले पोलिस दलातील आयुक्त, पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपायुक्त, निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच महसूल विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पालिका आयुक्त आदी अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होतील.

यादी करण्यास सुरुवात
निवडणूक आयोगाने बदलीचे आदेश देताना त्यासाठी कमी कालावधी दिल्याने पोलिस, महसूल तसेच इतर विभागांनी बदली पात्र अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत यासंदर्भातील बदली आदेश जारी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Transfer 'those' officers within two days, Election Commission orders state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.