राज्यातील ११ अपर महासंचालकांच्या बदल्या; ठाण्याच्या आयुक्तपदी विवेक फणसाळकर, नवी मुंबईला संजय कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 02:47 AM2018-07-31T02:47:58+5:302018-07-31T02:48:16+5:30

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. ठाण्याच्या आयुक्तपदाची धुरा एसीबीचे प्रभारी विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Transfers of 11 Additional Director General of the State; Sanjay Kumar of Navi Mumbai, Vivek Phansalkar as the Thane Commissioner | राज्यातील ११ अपर महासंचालकांच्या बदल्या; ठाण्याच्या आयुक्तपदी विवेक फणसाळकर, नवी मुंबईला संजय कुमार

राज्यातील ११ अपर महासंचालकांच्या बदल्या; ठाण्याच्या आयुक्तपदी विवेक फणसाळकर, नवी मुंबईला संजय कुमार

Next

मुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. ठाण्याच्या आयुक्तपदाची धुरा एसीबीचे प्रभारी विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंह यांची पोलीस मुख्यालयातील कायदा व सुव्यवस्थेच्या अपर महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. एकूण अकरा अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाºयांचे खांदेपालट करण्यात आले असून सीआयडीचे प्रमुख संजय कुमार यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून तेथील हेमंत नागराळे यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात
आली आहे.
पुण्याच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांची राज्य पोलीस वाहतूक महामार्गच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली असून त्यांची धुरा नागपूरचे आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी राज्य वाहतूक महामार्गचे अपर महासंचालक आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने सोमवारी दुपारी बदल्यांचे आदेश जारी केले असून संबंधितांना तातडीने नवीन पदावर रुजू होण्याची सूचना करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा १२० वरिष्ठ अधिकाºयांच्या बढत्या व बदल्यांचे आदेश जारी झाल्यानंतर प्रमुख आयुक्तालयातील आयुक्त व अन्य अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या केव्हा होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ‘लोकमत’मध्ये सोमवारी याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. सव्वातीन वर्षांपासून ठाण्यात कार्यरत असलेले परमबीर सिंह यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे महासंचालक कार्यालयात कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख पद सोपविण्यात आले. गेल्या आठ महिन्यांपासून त्याचा अतिरिक्त कार्यभार बिपीन बिहारी यांच्याकडे होता. परमबीर सिंह यांचा पदभार एसीबीचे प्रभारी प्रमुख विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्या जागी गृह विभागातील प्रधान सचिव रजनीश सेठ यांची बदली करण्यात आली आहे. सेठ यांच्या जागेवर वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. नागपूरचे डॉ. व्यंकटेशम यांच्यावर पुण्याच्या आयुक्तपदाची धुरा सोपविली असून त्यांचा पदभार कारागृहाचे महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे देण्यात आला आहे.
सीआयडीचे प्रमुख संजय कुमार यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा पदभार सीआयडीच्या गुन्हे अभिलेख विभागाचे अपर महासंचालक संजीव सिंघल यांच्याकडे दिला आहे. तर हेमंत नागराळे यांची पोलीस महासंचालक कार्यालयात सामग्री व तरतूदच्या अपर महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.

Web Title: Transfers of 11 Additional Director General of the State; Sanjay Kumar of Navi Mumbai, Vivek Phansalkar as the Thane Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस