१२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य शासनाने काढले आदेश

By यदू जोशी | Published: February 23, 2024 01:47 PM2024-02-23T13:47:46+5:302024-02-23T13:48:11+5:30

राज्यातील १२ प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

Transfers of 12 IAS officers; The order passed by the state government | १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य शासनाने काढले आदेश

१२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य शासनाने काढले आदेश

मुंबई - राज्यातील १२ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने या बदल्यांना मंजुरी दिल्यानंतर याबाबतचे आदेश काढले गेले. 
 

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे


1. कविता द्विवेदी महापालिका आयुक्त, अकोला यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे या पदावर

2. डॉक्टर हेमंत वसेकर आयुक्त, पशुसंवर्धन पुणे यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प पुणे या पदावर.

3. श्री कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प संचालक, स्मार्ट, पुणे यांची नियुक्ती आयुक्त, पशुसंवर्धन पुणे या पदावर

4. श्री कार्तिकी एन एस यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे या पदावर

5. श्री मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई या पदावर

6. श्री एम जे प्रदीप चंद्र यांचे नियुक्ती अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय मुंबई या पदावर

7. श्रीमती कावली मेघना यांची, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट या पदावर.

8. श्री विजय सिंगल महाव्यवस्थापक, बेस्ट यांची नियुक्ती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबई या पदावर

9. श्री संजय सेठी यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव, परिवहन व बंदरे या पदावर

10. श्री पराग जैन नैनोटिया, प्रधान सचिव (परिवहन व बंदरे) यांची नियुक्ती प्रधान सचिव, (माहिती तंत्रज्ञान) सामान्य प्रशासन विभाग, मुंबई या पदावर

11. श्री ओ पी गुप्ता अप्पर मुख्य सचिव (व्यय) वित्त विभाग यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग या पदावर

12. श्री राजेश कुमार यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग या पदावर

Web Title: Transfers of 12 IAS officers; The order passed by the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.