राज्यात 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 08:53 PM2023-12-01T20:53:37+5:302023-12-01T20:54:45+5:30

संबंधित अधिकाऱ्यांचे फेज-II प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या नियुक्त्या अथवा बदल्या करण्यात आल्या आहेत.

Transfers of 9 IAS officers in the maharashtra | राज्यात 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यात 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यांपैकी 7 अधिकाऱ्यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून, तर 2 अधिकाऱ्यांची सह-सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील उपविभागात नुयुक्ती करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांचे फेज-II प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या नियुक्त्या अथवा बदल्या करण्यात आल्या आहेत.

कुणाची कुठे करण्यात आली नियुक्ती? -
- आदित्य जीवने, IAS (2021) - फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, अटापल्ली उपविभाग, गडचिरोली पदी नियुक्त करण्यात आली आहे.

- श्रीमती करिश्मा नायर, IAS (2021) - फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, बीड उपविभाग, बीड, पदी नियुक्त करण्यात आली आहे.

- कवाली मेघना, IAS (2021) - फेज-2 चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी पदी सेलू उपविभाग, परभणी येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- विनायक महामुनी, IAS (2021) - फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नंदुरबार उपविभाग, नंदुरबार येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- Minnu P M, IAS (2021) - फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भातुकाली-तिवसा उपविभाग, अमरवती पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- राहुल कुमार मीना, IAS (2021) - फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली उपविभाग, गडचिरोली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

- सत्यम गांधी, IAS (2021) - फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची सहायक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया पदी नियुक्त करण्यात आले आहे.

- सुहास गाडे, IAS (2021) - फेज-2 चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, पुसद उपविभाग, यवतमाळ पदी नियुक्त करण्यात आली आहे.

श्रीमती मानसी, IAS (2021) - फेज-II प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Transfers of 9 IAS officers in the maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.