राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाण्यातील चौघांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 09:36 PM2022-06-08T21:36:18+5:302022-06-08T21:36:40+5:30

वाहतूक शाखेचे बाळासाहेब पाटील पालघरच्या अधीक्षकपदी: डॉ. पंजाब उगले यांना पदोन्नती

Transfers of IPS officers in the state; Including four from Thane | राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाण्यातील चौघांचा समावेश

राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाण्यातील चौघांचा समावेश

Next

जितेंद्र कालेकर

ठाणे: राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी गृहखात्याने काढले आहेत. यामध्ये ठाण्यातील चार अधिकाºयांचा समावेश आहे. ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांची मुंबईत संरक्षण व सुरक्षा विभागात तर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांची पालघरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.

कुंभारे यांच्या रिक्त झालेल्या जागी पदोन्नतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाण्याचे अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांची बदली झाली आहे. उगले यांना पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या ठाणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बढती मिळाली आहे. ठाणे आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार यांची यापूर्वीच महाराष्टÑ गुप्तवार्ता अकादमीमध्ये बदली झाली आहे. आता पवार यांच्या जागी महामार्ग सुरक्षा पथकाचे (पुणे) अधीक्षक संजय जाधव यांची बढतीवर बदली झाली आहे. त्यामुळे जाधव यांच्याकडे लवकरच ठाणे प्रशासन विभागाची सूत्रे येतील.

ठाण्याच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे तत्कालीन अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची पदोन्नतीवर ठाण्याच्या सह पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर कराळे यांचे पद रिक्त झाले होते. आता त्याजागी ठाणे पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून पालघरचे अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे.

ठाण्याला मिळालेले तिन्ही अतिरिक्त आयुक्त हे बढतीवर नव्यानेच दाखल होणार आहेत. त्यामुळे डॉ. पंजाब उगले, दत्तात्रय शिंदे आणि संजय जाधव या तिघांनाही अतिरिक्त आयुक्त पदाची पदोन्नती ही प्रथम ठाण्यात मिळाली आहे. शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी हे आदेश बुधवारी काढले असून बदलीच्या ठिकाणी सर्व अधिकारी गुरुवारी हजर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Transfers of IPS officers in the state; Including four from Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.