राज्यातील सहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 04:06 PM2021-06-03T16:06:31+5:302021-06-03T16:11:32+5:30

MMRDA महानगर आयुक्तपदी श्रीनिवासन यांची नियुक्ती.

Transfers of six IAS officers in the state Milind Mhaiskar as Principal Secretary Housing thackeray sarkar | राज्यातील सहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती

राज्यातील सहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती

googlenewsNext
ठळक मुद्देMMRDA महानगर आयुक्तपदी श्रीनिवासन यांची नियुक्तीएमएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदी कार्यरत असलेल्या आर.ए.राजीव यांचा कालावधी यापूर्वी संपुष्टात होता.

राज्य सरकारकडून सहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर, तर दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महानगर आयुक्तपदी एस.व्ही.आर.श्रीनिवास यांची नियुक्ती झाली आहे. एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदी कार्यरत असलेल्या आर.ए.राजीव यांचा कालावधी संपुष्टात होता. त्यानंतर या पदाचा अतिक्त कार्यभार अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे सोपण्यात आला होता. 

राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती झालेले मिलिंद म्हैसकर हे १९९३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, याशिवाय ते महसूल आणि वन विभागातही प्रधान सचिव म्हणूनही ते कार्यरत होते. दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महानगर आयुक्तपदी एस.व्ही.आर.श्रीनिवास हे १९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

याशिवाय लोकेश चंद्रा (प्रधान सचिव र.व का.) यांची नियुक्ती महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई पदावर करण्यात आली आहे. तर विकास चंद्र रस्तोगी यांची नियुक्ती प्रधान सचिव (र.व का.), सामान्य प्रशासन विभाग पदावर करण्यात आली. सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक बी. वेणुगोपाल यांची नियुक्ती मिलिंद म्हैसकर यांच्या जागी प्रधान सचिव (वने) या पदी करण्यात आली आहे. तर सुमंत भांगे यांची सुमंत भांगे यांची नियुक्ती सचिव,सा.वि.स. आणि वि.चौ.अ.(२) या पदावर करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचा कार्यभार होता. 

Web Title: Transfers of six IAS officers in the state Milind Mhaiskar as Principal Secretary Housing thackeray sarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.