पालिकेतील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

By admin | Published: August 23, 2016 01:15 AM2016-08-23T01:15:41+5:302016-08-23T01:15:41+5:30

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. चार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

Transfers under Municipal Officers | पालिकेतील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

पालिकेतील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

Next


पुणे : महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. चार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
सरकारकडून पालिकेच्या सेवेत आलेल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर घेतले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत केला होता. त्याला पुष्टी मिळेल अशाच बदल्या झाल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मंगेश जोशी बदलीच्या ठिकाणी वर्षभराने रुजू झाल्यानंतर ते पद रिक्त झाले होते. त्यावर पालिकेच्या मूळ सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती होणे अपेक्षित असताना त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी
यांच्याकडे देण्यात आला आहे. ते सरकारकडूनच पालिकेच्या सेवेत आले आहेत.
दक्षता विभागाचा अतिरिक्त कार्यभार प्रकाश बोरसे यांच्याकडे देण्यात आला आहे. सहायक आयुक्त उमेश माळी यांच्याकडे सहकारनगर क्षेत्रीय कार्यालबरोबरच समाजकल्याण विभाग देण्यात आला आहे. सहायक आयुक्त माधव देशपांडे यांच्याकडे कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालयासमवेत झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग आहे. (प्रतिनिधी)
>संध्या गागरे यांच्याकडे अतिक्रमण विभाग
सहआयुक्त विलास कानडे यांच्याकडे भूसंपादन व भूव्यवस्थापन विभाग देण्यात आला आहे. त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाची जबाबदारी सहायक आयुक्त संध्या गागरे यांच्याकडे आली आहे. सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्याकडे स्थानिक संस्था कर विभागाबरोबरच झोन ३ चीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर, उपायुक्त सुनील केसरी यांच्याकडे झोन १, सहआयुक्त सुरेश जगताप यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच झोन ४ ची जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: Transfers under Municipal Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.