ट्रान्सफाॅर्मर बिघडले? इथे कॉल करा, महावितरण कंपनीचे वीज ग्राहकांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 06:17 AM2022-12-19T06:17:49+5:302022-12-19T06:18:29+5:30

कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र (ट्रान्सफाॅर्मर) नादुरुस्त झाल्यास ते तत्काळ बदलण्याची मोहीम सध्या सुरू आहे.

Transformernot working properly Call here Mahavitaran maharashtra appeal to electricity consumers | ट्रान्सफाॅर्मर बिघडले? इथे कॉल करा, महावितरण कंपनीचे वीज ग्राहकांना आवाहन 

ट्रान्सफाॅर्मर बिघडले? इथे कॉल करा, महावितरण कंपनीचे वीज ग्राहकांना आवाहन 

googlenewsNext

मुंबई : कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र (ट्रान्सफाॅर्मर) नादुरुस्त झाल्यास ते तत्काळ बदलण्याची मोहीम सध्या सुरू आहे. ज्या ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाले असेल त्यासंबंधीची माहिती शेतकरी बांधवांनी संबंधित कार्यालयात किंवा चोवीस तास सुरु असलेल्या १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त झालेल्या ७१३८ पैकी ६५१६ रोहित्र केवळ ४८ ते ७२ तासांच्या कालावधीत बदलण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये नादुरुस्त झालेले केवळ ६२२ नादुरुस्त रोहित्र बदलणे शिल्लक असून ते तत्काळ बदलण्यात येत आहेत. महावितरणकडे सद्य:स्थितीत ४ हजार १८ रोहित्र बदलण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध आहेत. 

२९ नोव्हेंबरपूर्वी नादुरुस्त असलेले ६ हजार ९२ व त्यानंतर शनिवारपर्यंत नादुरुस्त झालेले ६ हजार ५१६ असे एकूण १२ हजार ६०८ नादुरुस्त रोहित्र युद्धपातळीवर बदलण्यात आले आहेत. कृषिपंपांना तीन फेजचा वीजपुरवठा करणारे महावितरणचे राज्यभरात एकूण ७ लाख ५४ हजार वितरण रोहित्र आहेत. यापूर्वी विविध कारणांमुळे सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० रोहित्र दररोज बदलणे शिल्लक राहत असल्याची परिस्थिती होती.

  • तथापि यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठ्याचे पाठबळ देण्यासाठी जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहित्र तत्काळ बदलून देण्याची सूचना महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना केली.
  • नादुरुस्त किंवा जळालेले वितरण रोहित्रांची दुरुस्ती करण्यासाठी १९३४ कंत्राटदार एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Web Title: Transformernot working properly Call here Mahavitaran maharashtra appeal to electricity consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.