निलेश राणेंवर तृतीयपंथी भडकले; 'हिजडा' शब्दावरून दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 01:14 PM2020-05-20T13:14:52+5:302020-05-20T13:17:32+5:30
निलेश राणे आणि रोहित पवार यांच्या वादाला आता वेगळे वळण लागले असून राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मुंबई : शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ट्विटरवरून टीका करणारे माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. या वाक् युद्धात, राष्ट्रवादीच्या अन्य एका युवा नेत्यानंही उडी घेतली होती. त्यांचा समाचार घेताना निलेश राणेंनी खालच्या पातळीवर टीका करत त्यांना हिजडा म्हटलं होतं. त्यावरून चिडलेल्या एका तृतीयपंथियानं ट्विटरवरून निलेश राणेंना इशारा दिला आहे.
जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल, इतिहास माहीत नसेल तर मी सांगते. पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका, अशा शब्दात सारंग पुणेकर या तृतीयपंथियाने निलेश राणेंना लक्ष्य केलं आहे. तोंडाला आळा घाला, हिजडा शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असंही ठणकावलं आहे.
जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल इतिहास माहीत नसेल तर मी सांगते पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका, जेंव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरावैरा पळत ना तशीच काही तुमची गत झालीये, तोंडाला आळा घाला हिजडा शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल@meNeeleshNRane@doke_snehalpic.twitter.com/oQCe7KsZLH
— Sarang Punekar (@sarang_punekar) May 19, 2020
काय आहे राणे-पवार वाद?
निलेश राणे आणि रोहित पवार यांच्या वादाला आता वेगळे वळण लागले असून राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साखर उद्योग वाचविण्याची मागणी केली होती. त्यावर शनिवारी भाजप नेते निलेश राणे यांनी कोणत्या साखर कारखानदाराकडे किती संपत्ती आहे, याचे ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणी ट्विटद्वारे केली होती. राणेंच्या या ट्विटवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया नोंदविताना म्हटले की, ‘पवार साहेबांनी साखर उद्योगासह कुक्कुटपालन व इतर उद्योगांच्या दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठविले आहे. यावर निलेश राणेंनी ‘मी साखरेवर बोललो. पवार साहेबांवर नाही. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? मतदारसंघावर लक्ष दे. सगळीकडे नाक नको टाकू. नाहीतर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी असं उत्तर रोहित पवारांना दिलं होतं.
मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही... कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी. https://t.co/nEJDfyblX7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 16, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
टोयोटा कल्ला करणार; हॅरिअरसारखी खतरनाक SUV Venza आणणार
कोरोना संकटात पीएफ काढताय? रिजेक्ट न होण्यासाठी या पाच चुका टाळा
आमदार रोहित पवार अन् निलेश राणे यांच्यातील ‘ट्विटर युद्ध’ पेटलं; मला, बोलत राहिलास तर...
CoronaVirus चीनने आधी 'मारले', आता औषध देण्याची तयारी; जगाच्या भल्यासाठी घेतले दोन मोठे निर्णय
तुम्ही कोणत्या झोनमध्ये? राज्यात काय सुरु, काय बंद; जाणून घ्या
बापरे! १०८ मेगापिक्सलचा Motorola Edge+ लाँच; लगेचच 15000 चा डिस्काऊंट