साई चौकातील वीजवाहिन्यांचे स्थलांतर

By admin | Published: June 10, 2016 01:50 AM2016-06-10T01:50:25+5:302016-06-10T01:50:25+5:30

बोपखेल ग्रामस्थांसाठी तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा

Transmission of electricity channels in Sai Chowk | साई चौकातील वीजवाहिन्यांचे स्थलांतर

साई चौकातील वीजवाहिन्यांचे स्थलांतर

Next


पिंपरी : बोपखेल ग्रामस्थांसाठी तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, या मागणीसाठी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची बुधवारी दिल्ली येथे भेट घेतली. या संदर्भात महिनाअखेरपर्यंत ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून, औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर पिंपळे निलख, साई चौक येथील उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या सहा उच्चदाब वीजवाहिन्या लष्कराच्या हद्दीत स्थलांतर करण्यासही संरक्षणमंत्र्यांनी मंजुरी दिली.
संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली, त्या वेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, नगरसेवक शत्रुघ्न काटे, सरचिटणीस प्रमोद निसळ उपस्थित होते.
बोपखेल ग्रामस्थांच्या दळवळणासाठी मुळा नदीवर तात्पुरता तरंगता पूल उभारला होता. मात्र, तो लष्कराने सोमवारी हा पूल काढून टाकला. त्यामुळे बोपखेलमधील नागरिकांना १८ ते २० किलोमीटर वळसा घालून पिंपरी-चिंचवडशी संपर्क करावा लागत आहे. नागरिकांची या त्रासातून सुटका करण्यासाठी महापालिका व लष्कराने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे आमदार जगताप यांनी संरक्षणमंत्र्यांकडे विविध मागण्या केल्या. कुंभमेळ्याच्या वेळी गंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या धर्तीवर बोपखेलच्या नागरिकांसाठी मुळा नदीवर पाँटून पूल तातडीने उभारण्याची मागणी केली. हा पूल उभारला जात नाही, तोपर्यंत सीएमईच्या हद्दीतून जाणारा जुना रस्ता बोपखेल ग्रामस्थांसाठी खुला करावा, अशी मागणीही केली. (प्रतिनिधी)
>पिंपळे सौदागर येथील लष्कराच्या हद्दीतून जाणारा रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता बंद केल्याने या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणीही केली. संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी बोपखेलवासीयांसाठी पर्यायी रस्ता आणि रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्त्याबाबत या महिनाअखेरपर्यंत ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
४औंध-रावेत बीआरटीएस रस्त्यावर पिंपळे निलख, साई चौक येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला सहा उच्चदाब वीजवाहिन्या अडथळा ठरत आहेत. वीजवाहिन्या लष्कराच्या हद्दीत स्थलांतरित केल्यास उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार आहे. वीजवाहिन्यांच्या स्थलांतरास मान्यता देण्याची मागणी त्यांनी तातडीने मान्य करून वीजवाहिन्या लष्कराच्या हद्दीत स्थलांतरित करण्यास मंजुरी दिली.

Web Title: Transmission of electricity channels in Sai Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.