गारपीटग्रस्तांचे पंचनामे पारदर्शकपणो व्हावे
By admin | Published: December 14, 2014 01:44 AM2014-12-14T01:44:24+5:302014-12-14T01:45:28+5:30
जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे शेतक:यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यांना तातडीने सरकारी मदत देण्याची गरज आहे.
Next
नाशिक : जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे शेतक:यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यांना तातडीने सरकारी मदत देण्याची गरज आहे. मात्र मदत देताना नुकसानग्रस्त बागांचे पारदर्शकपणो पंचनामे व्हायला हवे, अन्यथा गरजूंर्पयत मदत पोहोचणार नसून आलेला पैसा नेहमीप्रमाणो इतरांच्याच खिशात जाईल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
दोन दिवस नाशिक दौ:यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शहरातील गोदापार्कसह शिवाजी उद्यान व चिल्ड्रेन पार्कला भेट दिली. या वेळी गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतक:यांचे झालेल्या नुकसानीबाबत विचारले असता, त्यांनी सरकारी यंत्रणोवर निशाणा साधत पंचनामे पारदर्शकपणो होण्याची गरज असल्याचे सांगितले. अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतक:यांना सरकारी स्तरावरून मदत दिली जाते. मात्र थातूर-मातूर नुकसान दाखवून पंचनामे केले जात असल्याने गरजू शेतक:यांर्पयत मदत पोहोचत नाही. या वेळेसदेखील हा कित्ता गिरविला जाण्याची शक्यता आहे. कदाचित सरकारकडून नुकसानग्रस्त शेतक:यांसाठी कोटय़वधी रुपयांची पॅकेजेस् जाहीर केली जातील, मात्र मदत त्यांच्यार्पयत पोहोचेलच याबाबत साशंकता आहे. नव्या सरकारची आता ख:या अर्थाने परीक्षा असून, त्यांच्या भूमिकेकडे आपले लक्ष असेल, असेही राज यांनी स्पष्ट केले.
वेधशाळेचा अंदाजच चुकीचा
आपल्याकडील वेधशाळेने वर्तविलेला अंदाज कधीच खरा ठरत नाही. परदेशातील वेधशाळा आठ ते दहा दिवस अगोदरच हवामानातील बदलांबाबतची अचूक माहिती देतात. मात्र आपल्या वेधशाळांमध्ये नेमके कुठल्या पद्धतीने काम केले जाते याबाबत मला नेहमीच प्रश्न पडतो. त्यामुळे अगोदर वेधशाळा सक्षम करा जेणोकरून शेतक:यांचे होणारे नुकसान टाळता येईल, असे ते म्हणाले.