परिवहन विभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: April 8, 2017 01:24 AM2017-04-08T01:24:12+5:302017-04-08T01:24:12+5:30
राज्यातील परिवहन विभागातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि मोटार वाहन निरीक्षकांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या.
पुणे : राज्यातील परिवहन विभागातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि मोटार वाहन निरीक्षकांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पुणे कार्यालयातील अनिल पाटील आणि पिंपरी-चिंचवड कार्यालयातील अजित शिंदे यांची अनुक्रमे वसई व कराड येथे बदली झाली आहे.
राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकूण १२ उपप्रादेशिक अधिकारी, १७ सहायक अधिकारी आणि ७१ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. पुण्यातून बदली झालेले पाटील यांच्या जागी नांदेड येथील विनोद सगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अजित शिंदे यांच्या जागी पनवेल येथे कार्यरत असलेले आनंद पाटील यांची बदली झाली आहे. पुण्यातील सहायक अधिकारी राजेंद्र सातव यांची वाशी येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी पिंपरी-चिंचवड येथील विनोद चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोटार वाहन निरीक्षकांमध्ये पुण्यातून रमेश माळवदे, उत्तम राठोड, नीलेश दहेकर आणि माधव सूर्यवंशी यांची, तर पिंपरी-चिंचवड येथून संग्रामकुमार जगताप आणि सुरेश तुरकणे यांची बदली करण्यात आली आहे.