वाहन परवान्यासाठी ‘परिवहन’ संकेतस्थळ
By admin | Published: April 7, 2017 01:00 AM2017-04-07T01:00:35+5:302017-04-07T01:00:35+5:30
शिकाऊ वाहन परवाना मिळविण्यासाठी आता पूर्वीच्या सारथी ऐवजी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरावा लागणार आहे.
पुणे : शिकाऊ वाहन परवाना मिळविण्यासाठी आता पूर्वीच्या सारथी ऐवजी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरावा लागणार आहे. ही प्रणाली येत्या १० एप्रिल पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने विकसित केलेल्या सारथी ४.० या संगणकीय प्रणालीस दहा एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. सुरुवातीस शिकाऊ परवान्यासाठी ही प्रणाली वापरण्यात येणार असून टप्प्या-टप्प्याने सर्वच कामकाज या प्रणालींतर्गत होईल.
शिकाऊ परवान्यासाठी ‘परिवहन’ या नवीन संकेतस्थळावरून अर्ज करावा व अर्ज भरल्यानंतर, अर्ज क्रमांक नोंदवून घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. संकेतस्थळावर जन्मतारखेचा आणि पत्त्याचा पुरावा असलेली कागदपत्रे स्कॅन करून त्यावर जोडावीत. कागदपत्रांचा आकार एक एमबीपेक्षा कमी असावा. तसेच जेपजी, जेपीईजी अथवा पीडीएफ पद्धतीची फाइल असावी.
(प्रतिनिधी)
शिकाऊ परवान्यासाठी नव्याने आरक्षण
जुन्या ‘सारथी’ या संकेतस्थळावरून शिकाऊ परवान्यासाठी वेळ आरक्षित करणाऱ्या व्यक्तींना देखील नवीन संकेतस्थळावरून पुन्हा नोंदणी करावी लागेल. त्यासाठी त्यांनी परिवहन या संकेतस्थळावरील ‘सारथी’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर स्क्रीनवरील ‘अॅप्लाय आॅनलाइन’ या ड्रॉपबॉक्सवर अॅप्लिकेशन स्टेट्सवर जुना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख नमूद करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
त्यानंतर ‘सारथी एनआयसी इन’ या पर्यायावर गेल्यास नवीन अर्ज क्रमांक मिळेल. या क्रमांकाचा वापर करून कागदपत्रे अपलोड करून वेळ आरक्षित करावी लागेल, असे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.