पारसिक बोगद्याजवळ संरक्षक भिंत कोसळून फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पुर्णपणे ठप्प
By admin | Published: June 21, 2016 11:56 AM2016-06-21T11:56:23+5:302016-06-21T12:26:27+5:30
उदयनगर येथे पारसिक बोगद्याजवळ संरक्षक भिंतीचा कठडा रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने ठाणे रेल्वे स्टेशनवर फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
ठाणे, दि. 21 - उदयनगर येथे पारसिक बोगद्याजवळ संरक्षक भिंतीचा कठडा रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने ठाणे स्थानकातील
फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. संरक्षक भिंतीचा कठडा कोसळल्याने दरड कोसळण्याची भीती व्यक्त असून तात्काळ ब्लॉक घेऊन संरक्षण भिंतीचं काम करण्यात यावे, अशी विनंती महापालिकेने मध्य रेल्वेच्या अधिका-यांकडे केपूली आहे. दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकावर फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे अधिका-यांशी यासंबंधी बातचीत केली आहे. कल्याण आणि ठाणेदरम्यान जास्तीत जास्त बसेस सुरु करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांना एक्स्प्रेस प्रवास करण्याची मुभा देण्याचीही विनंती केली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या अतिरिक्त बसेस नवी मुंबई. ठाण्याच्या दिशेने, तर ठाण्याच्या बसेस नवी मुंबई आणि कल्याणच्या दिशेनं सोडणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.