फळ बाजारात कचऱ्याचे साम्राज्य

By admin | Published: June 11, 2016 02:50 AM2016-06-11T02:50:02+5:302016-06-11T02:50:02+5:30

एपीएमसी प्रशासनाने फळ मार्केटमध्ये उपाहारगृह व कँटीन उपलब्ध करून दिले आहेत.

Trash Empire in the fruit market | फळ बाजारात कचऱ्याचे साम्राज्य

फळ बाजारात कचऱ्याचे साम्राज्य

Next


नवी मुंबई : एपीएमसी प्रशासनाने फळ मार्केटमध्ये उपाहारगृह व कँटीन उपलब्ध करून दिले आहेत. परंतु कँटीनचे सांडपाणी वाहून नेण्याची यंत्रणाच नसल्याने पाणी रोडवर साचत आहे. एपीएमसीने कँटीनचालकांचेही प्रचंड नुकसान केले असून अधिकृत वाटप केलेल्या कँटीनचे बांधकाम करताना पालिकेची परवानगी घेतलेली नाही.
बाजार समितीमधील देखभाल शाखेच्या अनागोंदी कारभाराविषयी असंतोष वाढू लागला आहे. पाचही मार्केटमधील एकही विकासकाम वेळेत व दर्जात्मक केलेले नाही. व्यापारी, कँटीन व इतर व्यावसायिकांची अडवणूक केली जात आहे. फळ बाजार नवी मुंबईत स्थलांतर झाल्यानंतर प्रशासनाने वर्तमानपत्रामध्ये उपाहारगृह भाडेतत्त्वावर देण्याची जाहिरात दिली होती.
अनेक व्यावसायिकांनी रीतसर टेंडर भरून उपाहारगृहे चालविण्यासाठी घेतली आहेत. एपीएमसीने बांधकाम करून ते व्यवसायासाठी उपलब्ध केले परंतु अद्याप त्यासाठीची बांधकाम परवानगीच घेतलेली नाही. उच्च न्यायालयाने मूळ जागेपेक्षा अजून तेवढीच जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश बाजार समितीला दिले आहेत. परंतु त्यासाठी आवश्यक परवानगी महापालिकेकडून मिळवून दिली जात नाही. तुम्हीच परवानगी आणा असे व्यावसायिकांना सांगितले जात आहे. वास्तविक सर्व प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण करून देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकत आहे.
बाजार समितीमधील काही व्यावसायिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर येथील अनागोंदी कारभाराविषयी माहिती दिली. मार्केटमधील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच झाली आहेत. रीतसर निविदा भरून उपाहारगृह मिळविले परंतु प्रत्यक्षात आम्हाला करारपत्र देताना उपाहारगृहाचा उल्लेख केला नाही. यामुळे आम्हाला हॉटेल परवाना मिळविण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. येथील रस्ते व मलनि:सारण वाहिन्या टाकताना कँटीनचे पाणी मलनि:सारण वाहिनीमध्ये जाण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही. यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी रोडवर आलेले दिसत आहे. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांचा फटका येथे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना बसत असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Trash Empire in the fruit market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.