तृप्ती देसाई व त्यांच्या पतीविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By admin | Published: July 6, 2017 12:49 PM2017-07-06T12:49:16+5:302017-07-06T14:22:41+5:30

भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई, त्यांचे पती आणि अन्य चौघांविरोधात हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tratpti Desai and her husband filed a complaint against Atrocity | तृप्ती देसाई व त्यांच्या पतीविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

तृप्ती देसाई व त्यांच्या पतीविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Next

ऑनलाइन लोकमत 

वाकड, दि. 6 -  भूमाता  ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई, त्यांचे पती आणि अन्य चौघांविरोधात हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीला मारहाण करुन त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीवर आहे.
 
विजय मकासरे यांनी हिंजवडी पोलिसांत ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार जातीवाचक शिवीगाळ करून खंडणी मागणे, मारहाण करणे, रस्ता अडविणे असे गुन्हे या सर्वांवर दाखल करण्यात आले आहेत.   याबाबत हिंजवडी पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की,  २७ जून २०१७ रोजी सकाळी ११.३० वाजता फिर्यादी मकासरे बालेवाडी येथील व्हीनस ग्रॅनाईडकडे मोटरीतून तृप्ती देसाईंसोबत जात होते. 
 
आणखी वाचा 
 
दरम्यान प्रशांत देसाई, सतीश देसाई, कांतीलाल गवारे आणि इतर दोघे चारचाकी मोटारीतून आले. त्यांनी फिर्यादी विजय मकासरे यांना गाडी  थांबवायला भाग पाडले. तृप्ती देसाईसह सर्वांनी आपल्याला लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच प्रशांत देसाई यांनी गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची चैन आणि २७ हजार रुपये काढून घेतले. 
 
तृप्ती देसाई यांनी आमच्याविरोधात गेलास तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन, अशी धमकी दिली आणि जातीवाचक शब्दांचा वापर केला, असा आरोप विजय मकासरे यांनी हिंजवडी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे. 
 
शनी शिंगणापूर मंदिरातील चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर तृप्ती देसाई चर्चेत आल्या. ज्या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही त्यासाठी तृप्ती देसाईंची संघटना आंदोलन करते तसेच स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली आहेत. हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी सुद्धा त्यांनी आंदोलन केले आहे. 
 
मागच्यावर्षी त्यांनी नगररोडवरील शिक्रापूर चौकात एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. श्रीकांत लोंढे असं मारहाण मारहाण केलेल्या तरुणाचे नाव होते. एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होतं. लग्नाचं आमिष दाखवून तीच्याशी शरीरसंबंध ठेवले. मात्र मुलीला दिवस जाऊनही श्रीकांतने लग्न न केल्याने, तसंच पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप न केल्याने, या तरुणाला चोप दिल्याचं, तृप्ती देसाई यांनी सांगितले होते.

Web Title: Tratpti Desai and her husband filed a complaint against Atrocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.