अवजड वाहतुकीचा प्रवाशांना त्रास

By admin | Published: June 29, 2016 01:33 AM2016-06-29T01:33:22+5:302016-06-29T01:33:22+5:30

पुणे-मुंबई महामार्गावरील कंटेनरच्या जड वाहतुकीमुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

Traumatic to passengers with heavy traffic | अवजड वाहतुकीचा प्रवाशांना त्रास

अवजड वाहतुकीचा प्रवाशांना त्रास

Next


तळेगाव दाभाडे : पुणे-मुंबई महामार्गावरील कंटेनरच्या जड वाहतुकीमुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वाहतूकदार बिनधास्तपणे दिवसाढवळ्या कशाचीही तमा न बाळगता वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून सर्रास वाहतूक करताना दिसतात. अशा बेजबाबदार वाहतूक चालकांवर कारवाई करून जड वाहनांना वाहतुकीसाठी ठराविक वेळ निर्धारीत करणे गरजेचे आहे. तळेगावमधून दररोज हजारो वाहने जात येत असतात.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांची वाहतूक याच रस्त्याने होत असते. पुणे परिसरातील औद्योगिक वसाहतीसह तळेगाव एमआयडीसी वसाहतीतील कारखानदारीशी संबंधित अनेक वाहने, कंटेनर, जड व अवजड वाहने याच हायवेने मार्गक्रमण करत असतात. मात्र त्यांची वेळ मर्यादित नसते. (वार्ताहर)

Web Title: Traumatic to passengers with heavy traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.