कश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

By admin | Published: February 2, 2016 12:55 AM2016-02-02T00:55:29+5:302016-02-02T00:55:29+5:30

‘सायकल हे जहॉँ तंदुरुस्ती है वहॉँ...’, ‘राइड सायकल सेव्ह अर्थ’ असा पर्यावरणसंवर्धन आणि आरोग्याचा संदेश देत धैर्यशील पवार यांनी देशभरात सायकलवरून भ्रमण केले

Travel from Kashmir to Kanyakumari Bicycle | कश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

कश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

Next

पिंपरी : ‘सायकल हे जहॉँ तंदुरुस्ती है वहॉँ...’, ‘राइड सायकल सेव्ह अर्थ’ असा पर्यावरणसंवर्धन आणि आरोग्याचा संदेश देत धैर्यशील पवार यांनी देशभरात सायकलवरून भ्रमण केले. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर श्रीनगर ते कन्याकुमारी असा ४ हजार किलोमीटर अंतर त्यांनी अवघ्या ३७ दिवसांत पूर्ण केला. सायकल चालवण्याबाबत जनजागृतीसाठी बारामती येथील ४५ वर्षीय पवार यांनी सायकल मोहीम हाती घेतली. श्रीनगर येथील लाल किल्ला येथून सुरुवात केली. जम्मू-काश्मीर, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ असे नऊ राज्यांतून त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि तंदुरुस्तीची माहिती दिली. प्रवासात नागरिकांना सायकलचे महत्त्व पटवून दिले. इंधन बचतीबरोबरच आरोग्यास होणारे फायदे सांगितले. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले. इतर सायकलस्वारांनी काही अंतर साथ दिली. देहूरोडजवळील घोरावडेश्वर टेकडी येथे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला गेला. पवार यांनी व्हॉट्स अ‍ॅपवर गु्रप केला होता. त्यावर दररोज प्रवासाची माहिती व छायाचित्रे देत होते. ही माहिती व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुक असा सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट होत. कोणाचीही मदत न घेता एकट्याने गेल्या महिन्यात मोहीम यशस्वी केली. खडतर घाट, हाडे गोठविणारी थंडी, त्यातच पाऊस अशा प्रतिकूल वातावरणात त्यांनी श्रीनगर ते जम्मू असा ३०५ किलोमीटरचे अंतर कापले. या दरम्यान पॅण्डलचे थ्रेड खराब झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. अंतिम टप्प्यात तमिळनाडूत उष्ण आणि दमट वातावरणामुळे अधिक ताण आला. सकाळी साडेसहा ते सायंकाळी साडेसहा या वेळेत ते १२५ किलोमीटर अंतर कापत पंजाबमध्ये एका दिवसात सर्वाधिक १६० किलोमीटर अंतराचा प्रवास केला. संध्याकाळनंतर जवळच्या हॉटेलवर मुक्काम करीत, दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे उठून नव्या दम्याने प्रवास सुरू करीत, महामार्गाजवळील गाव आणि शहरातील नागरिकांना प्रतिसाद उत्साह वाढविणारा ठरला. (प्रतिनिधी)

Web Title: Travel from Kashmir to Kanyakumari Bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.