मुंबई ते शिर्डी प्रवास ‘सुपरफास्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2017 03:41 AM2017-02-15T03:41:11+5:302017-02-15T03:41:11+5:30

मुंबईतून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एप्रिल ते जून या महिन्यात उन्हाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

Travel from Mumbai to Shirdi 'Superfast' | मुंबई ते शिर्डी प्रवास ‘सुपरफास्ट’

मुंबई ते शिर्डी प्रवास ‘सुपरफास्ट’

Next

मुंबई : मुंबईतून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एप्रिल ते जून या महिन्यात उन्हाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मुंबई ते शिर्डी असा प्रवास सुसाट व्हावा यासाठी मध्य रेल्वेकडून ५२ सुपरफास्ट ट्रेन सोडल्या जातील. यात एलटीटी-साईनगर शिर्डी एसी सुपरफास्टच्या २६ फेऱ्या तर दादर-साईनगर शिर्डीच्या २६ फेऱ्या होतील, अशी माहिती देण्यात आली. या ट्रेन प्रत्येक आठवड्यातून एकदा सुटतील.
एलटीटी-साईनगर शिर्डी एसी सुपरफास्ट (२६ फेऱ्या)
ट्रेन नंबर 0२१२९ एलटीटीहून ६ एप्रिल ते २९ जूनपर्यंत २१.४५ वाजता प्रत्येक गुरुवारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी साईनगर शिर्डी येथे ३.३५ वाजता पोहोचेल.
ट्रेन नंबर 0२१३0 साईनगर शिर्डीहून ७ एप्रिल ते ३0 जूनपर्यंत प्रत्येक शुक्रवारी ९.२0 वाजता सुटेल आणि दादर येथे त्याच दिवशी १५.१0 वाजता पोहोचेल. या ट्रेनला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, कोपरगाव येथे थांबा देण्यात येईल.
दादर-साईनगर शिर्डी सुपरफास्ट ट्रेन (२६ फेऱ्या) ट्रेन नंबर 0२१३१ दादर येथून प्रत्येक शुक्रवारी ७ एप्रिल ते ३0 जूनपर्यंत २१.४५ वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी ३.४५ वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0२१३२ साईनगर शिर्डी येथून
८ एप्रिल ते १ जुलैपर्यंत प्रत्येक शनिवारी ९.२0 वाजता सुटेल आणि दादर येथे १५.२0 वाजता पोहोचेल. (प्रतिनिधी)

Web Title: Travel from Mumbai to Shirdi 'Superfast'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.