वर्दळीच्या रस्त्यावरून रुग्णाचा २०० मीटर स्ट्रेचरवर प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2016 09:41 PM2016-10-25T21:41:53+5:302016-10-25T21:41:53+5:30
अपघातातील गंभीर जखमीला शासकीय रुग्णालयात नेता यावे म्हणून नागरिकांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलाविली. परंतु चालकाने रुग्णवाहिका घटनास्थळी आणण्यास नकार दिल्याने नागरिकांना अखेर
Next
style="font-family: HelveticaNeue, "Helvetica Neue", Helvetica, Arial, "Lucida Grande", sans-serif; font-size: 16px;">
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 25 - अपघातातील गंभीर जखमीला शासकीय रुग्णालयात नेता यावे म्हणून नागरिकांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलाविली. परंतु चालकाने रुग्णवाहिका घटनास्थळी आणण्यास नकार दिल्याने नागरिकांना अखेर खासगी रुग्णालयाच्या स्ट्रेचरवरून वर्दळीच्या रस्त्याने २०० मीटर प्रवास करीत रुग्णाला शासकीय रुग्णालयात पोहोचवावे लागले. हा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडला.
लाख(रायाजी) येथील सोयाबीन काढणारे मजूर अॅपे वाहनाने शिवापूरकडे येत होते. त्यावेळी अचानक डुक्कर समोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व अॅपे पलटी झाला. या अपघातात संतोष बबन कनाके (२२), रुख्मा भगवान मडावी (४५), दुर्गा रवी सुरपाम (३०), जनाबाई कुळसंगे (६०), लक्ष्मी आत्राम (५०) व मोहन आत्राम (१६) असे सहा जण जखमी झाले. त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी लगतच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून गंभीर जखमी असलेल्या संतोष कनाके व रुख्मा मडावी यांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. म्हणून उपस्थितांपैकी काहींनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका त्या खासगी रुग्णालयाजवळ आणण्याची विनंती केली. मात्र त्या चालकाने तेथे येण्यास नकार दिला. त्याची रुग्णवाहिका दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयासमोर उभी होती. अखेर नागरिकांनी खासगी रुग्णालयातील स्ट्रेचर घेऊन ग्रामीण रुग्णालयापर्यंतचा २०० मीटरचा प्रवास दिग्रसच्या मुख्य रहदारीच्या मार्गावरून केला. या दोनही रुग्णांना स्ट्रेचर लोटत मुख्य रस्त्याने शासकीय ग्रामीण रुग्णालयापर्यंत आणण्यात आले. तेथे उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत नेऊनही सदर चालक या रुग्णांना घेऊन यवतमाळला जाण्यास तयार नव्हता. त्याने विशिष्ट कागदपत्रांची मागणी केली. शिवाय वादही घातला. अखेर रुग्णांची अवस्था पाहून ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनीच पुढाकार घेत तातडीने त्याला कागदपत्रे तयार करून दिली व रुग्णांना यवतमाळला नेण्याची विनवणी केली. तेव्हा कुठे हा चालक त्या रुग्णांना घेऊन रुग्णवाहिकेने यवतमाळकडे रवाना झाला. रुग्णवाहिका चालकाच्या या वागणुकीविरुद्ध अपघातग्रस्तांना मदत करणाºया नागरिकांनी मात्र तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरही या प्रकाराचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.